Mumbai

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई येथे पहाटे पासुन मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे…

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई येथे पहाटे पासुन मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे…

पी व्ही आनंद मुंबई

मुंबई : मुंबई व उपनगरात दि.09.06.2021 रोजी सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये आज हिंद माता जंक्शन, सायन सर्कल, सायन सर्कल, बीपीटी कॉलनी, सरदार हॉटेल जंक्शन, षण्मुखानंद हॉल परिसर, नायर हॉस्पीटल जवळ, दादर टीटी, शिवाजी चौक सायन, वडाळा लाब्रेरी जंक्शन, अंधेरी सबवे, खार सबवे, मालाड सबवे, मानखुर्द रेल्वे स्टेशन नारायण नगर कुर्ला व सायन ब्रिजखालील परिसरात पाणी साचले आहे. अशी प्राथमिक माहिती मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्ष यांनी दिली आहे.

• पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे सीएसएमटी ते ठाणे रेल्वे वाहतुक बंद आहे. हर्बर लाईन सीएसएमटी ते वाशी रेल्वे वाहतुक बंद आहे. पश्चिम रेल्वे सुरु आहे अशी माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाने दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button