Patur

हाथरस नराधमांना शिक्षा द्या बिरसा क्रांती दलाची मागणी

हाथरस नराधमांना शिक्षा द्या बिरसा क्रांती दलाची मागणी

पातूर प्रतिनिधी :विलास धोंगडे

उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरापूर येथील बलात्कार करण्याऱ्याना शिक्षा झाली पाहिजे काही राजकीय पक्षांनी विनाकारण आरोपींनची पाठराखण करून त्यांमध्ये राजकारण करू नये अशी मागणी देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान बिरसा क्रांती दल अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले की बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू असताना दुसरीकडे उत्तरप्रदेश राज्यात हाथरस बलरापूर या ठिकाणी बलात्कार होऊ त्या मृत्यूमुखी पडल्या आहेत ही बाब ही बाब अत्यंत दुर्दैवी असून देशाला कलंकित करणारी आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या घटनांचा बिरसा क्रांती दलाच्या वतीने जाहिर निषेध नोंदविण्यात येत आहे हाथरस व बलरापूर येथील बलात्काराच्या घटना अक्षरश: अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत हाथरस येथील दलित समूहाच्या मूलीची जीभ कापून चोंघानी सामूहिक बलात्कार केला आहे तर बलरापूर येथील मुलीवर बलात्कार करून पाय तोडून टाकले आहे या दोन्ही मूली मंगळवार (दिनांक २९)एकाच दिवशी मरण पावल्या बलात्काराच्या घटनेत दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या सदर मूंलीना जलदगतीने न्याय मिळावा म्हणून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या दोशींना मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे बिरसा क्रांती दल पातूर ता अध्यक्ष रामचंद्र लोखंडे हरिदास करवते विलास धोंगडे सुधाकर पांडे नवनाथ पवार रामेश्वर डाखोरे सूहास देवकर गजानन ठाकरे दिपक भोकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button