Amalner

अमळनेर: पुज्य सानेगुरुजी वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुज्य सानेगुरुजी वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर होत्या.
अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर यांनी केले तर बाबासाहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ प्रा. माधुरी भांडारकर यांनी केले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला त्यांची अनेक पुस्तके वाचनालयामध्ये वाचकांसाठी वाचण्यासाठी ठेवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भिमराव जाधव यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला वाचनालयाचे संचालक पी. एन भादलीकर, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर व वाचन प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button