Baramati

? Big Breaking… न्यायासाठी भटक्या विमुक्त जमाती संघटना आंदोलनाच्या प्रवित्र्यात

भटक्या विमुक्त जमाती संघटना आंदोलनाच्या प्रवित्र्यात

बारामती प्रतिनिधी – आनंद काळे

महाराष्ट्र शासन पारधी समाज्यासाठी फार गंभीर नाही.महाराष्ट्र राज्यामध्ये पारधीसमाजावर अन्याय,अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.असाच काही प्रकार मौजे म्हातोबा आळंदी ता हवेली जि पुणे येथे घडला आहे.म्हातोबा आळंदी येथे वास्तव्यास असणारे पारधी कुटुंब सौ रोहिणी विशाल पवार ह्या गेली 15 वर्षापासून गावात वास्तव्यास आहे. त्यांना आजपर्यंत आदिवासी समाज्याच्या कोणत्याही योजना ग्रामपातळीवरून त्यांना मिळयाला नाहीत.दि 18/08/2020 रोजी त्यांचे वास्तव्यास असणारे जुने शेड पावसामुळे पडले असता त्याठिकाणी दुसरे पत्राचे शेड मारायचे चालू असताना म्हातोबा आळंदी मधील स्थानिक गावगुंडांनी येऊन पारधी कुटुंबातील व्यक्तींना दमबाजी केली,त्यामध्ये सांगितले की तुम्ही येथे आत्ता पत्राचे शेड मारायचे नाही,पत्राचे शेड मारले तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लावतील असा सजड दम दिला.त्यामुळे पारधी कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याच्यावर फोजदारी कारवाई करण्यात यावी असे आशयाचे निवेदन मा ना अनिलजी देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सेक्रेटरी श्री आनंद काळे यांनी पाठविले आहे.

तसेच,महाराष्ट्र शासनाने आदिवासी जमातीसाठी खावटी योजना मंजूर केली आहे,त्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींच्या बँक खात्यावर 2000 हजार रुपये जमा होणार आहेत व दोन हजार रुपयांचे किराणा माल,इतर साहित्य मिळणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सन2008-09 मध्ये काही विभागातील पारधी कुटुंबाचे पारधी सर्व्हेक्षण झालेले आहे त्यामधील काही पारधी कुटुंबातील व्यक्तीचे अद्यापही सर्व्हेक्षण झालेले नाही त्यामुळे खावटी योजनेचा पारधी समाज्याला पूर्णत्व: लाभ मिळणार नाही.त्यासाठी राज्यशासनाने प्रशासकीय अधिकारी व आदिवासी विभागातील कर्मचारी यांना तात्काळ आदेश देऊन पारधी समाज्याचे सर्वेक्षण करण्यात यावे.खावटी योजनेपासून कोणतेही पारधी कुटुंब वंचित राहणार नाही असे शासनाने कटिबद्ध रहावे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पारधी समाज्याचे अतोनात हाल झाले आहेत शासनाच्या थोडयाफार मदतीने पारधी कुटुंबातील व्यक्तींना आधार भेटेल.त्यासाठी राज्यशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावे असे आशयाचे निवेदन आदिवासी विकासमंत्री ना. के.सी.पाडवी यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनामध्ये पारधी कुटुंबावर अन्याय अत्याचार करणाऱ्या स्थानिक गावगुंडावर मोक्काअंतर्गत कारवाई करावी व आदिवासी खावटी योजनांची अंमलबजावणी पारधी समाज्यासाठी तात्काळ सुरू करून त्यांचा सर्व्हे करण्यात यावा,अन्यथा भटक्या विमुक्त जमाती संघटना, अखिल भारतीय सम्राट सेना(पारधी आघाडी) शासकीय कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती निवेदनात नमूद केली आहे.निवेदनाच्या प्रति मा आयुक्त आदिवासी विभाग नाशिक,सर्व उपायुक्त आदिवासी विभाग,सर्व प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.निवेदनावर भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सेक्रेटरी श्री आनंद काळे,अखिल भारतीय सम्राट सेचे पारधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री बापूराव काळे,आकाश भोसले,सागर काळे,नियोजन भोसले, लाला भोसले,भगवान भोसले,अभिजित काळे,सूरज काळे आदींच्या सह्या केल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button