Faijpur

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त दिपाली गृप्स कार्यालय फैजपूर येथे अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त दिपाली गृप्स कार्यालय फैजपूर येथे अभिवादन

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर प्रतिनिधी: स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान, लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिपाली गृप्स कार्यालय, सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल फैजपूर येथे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलेल्या एकता व अखंडतेच्या मार्गावर चालण्याची यावेळी उपस्थितांनी प्रतिज्ञा करण्यात आली.
यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व उद्योजक निलेश राणे,माजी जि.प.व पं.स.सभापती भरत महाजन, मा.उपनगराध्यक्ष नगरसेवक केतन किरंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर साहेब, पीएसआय मोहन लोखंडे साहेब,भाजपा शिक्षक आघाडीचे राजू महाजन सर, खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, महिला बचत गट प्रमुख अनुराधा परदेशी,भारती पाटील, दिव्यांग सेना जिल्हा संघटक नानाभाऊ मोची,यावल तालुका संगायो समीती सदस्य नितीन महाजन,दिव्यांग सेना तालुकाध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी, भाजपा सरचिटणीस संजय सराफ, संजय भावसार, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष व पत्रकार संस्था फैजपूर फारुक शेख, कॉंग्रेस तालुका प्रसिद्धी प्रमुख गणेश गुरव सर, वाल्मीकी समाज शहराध्यक्ष संजय रल, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अशोकजी भालेराव, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील, नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय मंडवाले, कांतीलाल चौधरी, महेंद्र धांडे, मनोज राणे, मयुर बोरसे, जितेंद्र चौधरी सर, महेंद्र चौधरी, विनोद परदेशी, पत्रकार सलीम पिंजारी, नेहेते,अक्षय धांडे, युवराज चौधरी,भाविल पाटील, अशोक धांडे गुरुजी, देवेंद्र झोपे सर,कार्तीक संजय रल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा परदेशी यांनी तर आभारप्रदर्शन नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी केले.यावेळी योगेश उर्फ मुन्ना चौधरी यांची दिव्यांग सेना तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button