Kolhapur

पगारासाठी भव्य आंदोलनाची गरज-मंगेश धनवडे

पगारासाठी भव्य आंदोलनाची गरज-मंगेश धनवडे

सुभाष भोसले-कोल्हापूर
गेल्या काही महिन्यात किंबहुना वर्षात एका महत्वाच्या प्रश्नामुळे संपूर्ण शिक्षक वर्ग अत्यंत त्रस्त आहे. तो विषय म्हणजे पगार.ज्या पगारावर संपूर्ण कुटुंब आणि दैनंदिन व्यवहार अवलंबून असतात, त्याच पगाराची अहवेलना नजरेसमोर होत आहे. पगाराची संबंधित असलेली ही यंत्रणा हा विषय गांभीर्याने घेताना दिसत नाही. खरं तर सर्वच प्रश्नांच्या बाबतीत शिक्षक या घटकाला अत्यंत महत्त्वहीन करण्याचा प्रकार घडत आहे.

यातून शिक्षक वर्गाचा स्वाभिमानढळून गेला आहे. आणि या सर्व पगाराच्या परिस्थितीसाठी सातत्याने प्रयत्न करून देखील संघटनांनाही जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे, जिल्ह्यातील साडेसात हजार शिक्षक आणि सर्व संघटना एकत्र येऊन एक भीम टोला लावण्याची.पगाराची मेसेज टाकण्यात पुरत्या संघटना मर्यादित नसून पगार 1 तारखेलाच झाला पाहिजे, हे दाखवण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व सर्व संघटना एकत्र येऊन एक भव्य आंदोलन करणे अत्यंत आवश्यक आहे. पेन्शन हक्क संघटन म्हणून आम्ही तर या गोष्टीसाठी नेहमी तयार आहोत. कारण चळवळीतूनच या संघटनचा जन्म झाला आहे. पण एका किंवा दुसऱ्या संघटनेने आंदोलन करून तीव्रता लक्षात येणार नाही. म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलनाची नितांत गरज आहे.असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button