Yawal

हर घर झेंडा उपक्रम अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील व ज्योती सोनवणे यांनी शिरसाड गावातील वार्ड क्रमांक 4 मध्ये स्वखर्चाने तिरंगा ध्वज वाटप

हर घर झेंडा उपक्रम अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील व ज्योती सोनवणे यांनी शिरसाड गावातील वार्ड क्रमांक 4 मध्ये स्वखर्चाने तिरंगा ध्वज वाटप

शब्बीरखान ( यावल ):- शिरसाड ता.यावल येथील ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील व ज्योती प्रवीण सोनवणे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हर घर झेंडा उपक्रम निमित्त स्वखर्चाने तिरंगा ध्वज घेऊन गावातील वार्ड क्रमांक 4 मध्ये घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. यावेळी तेजस पाटील व ज्योती सोनवणे यांच्या सोबत मा. सरपंच प्रवीण सोनवणे, मा.उपसरपंच धनंजय पाटील, मा. ग्रामपंचायत सदस्य आबा ठाकूर तसेच अतुल महाजन, बापू पाटील, वासुदेव सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, विशाल इंगळे, पंकज खंबायत, पांडुरंग पाटील, विलास धनगर यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाचे गावातील नागरिकांकडून तसेच संपूर्ण पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे. स्वखर्चाने तिरंगा ध्वज वाटप करणारे गावातील आणि पंचक्रोशीतील पहिले ग्रामपंचायत सदस्य आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button