Health: सावधान..! गॅस वर पोळी भाजताय..! आरोग्यास धोकादायक..!
भारतीय जेवणात रोज जर कोणता पदार्थ ताटात दिसत असेल तर तो म्हणजे चपाती किंवा पोळी. यासह आमटी, भात आणि भाजी हे पदार्थ असतातच. पण प्रत्येक पदार्थ खाण्याची एक योग्य वेळ असते याबाबत तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही एखाद्याला चपाती कोणत्या वेळी खाता असं विचारलं तर जेवणात दोन्ही वेळा असं अनेकांकडून उत्तर येईल.
मात्र चपाती खाण्याची एक विशिष्ट वेळ असते. चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स आढळतात. रात्री चपाती खाल्ल्याने पचायला अधिक वेळ लागतो. तसंच रात्री चपाती खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही असतो. रात्रीच्या जेवणात खाणे योग्य की अयोग्य याबाबत आम्हाला सांगितले आहे डॉ. माधव भागवत यांनी. तुम्हीही जाणून घ्या.
रात्री चपाती खावी की नाही?
एका चपातीमध्ये साधारण ७१ कॅलरी असते. तुम्ही जर रात्री २ पोळ्या खाल्ल्या तर तुमच्या शरीरात १४२ कॅलरी जाते. रात्रीच्या वेळी चपातीचे सेवन केल्याने वजन वाढण्याचा धोका अधिक वाढतो, असं डॉक्टरांनी सांगितले.
दुपारची वेळ योग्य
चपाती दुपारी खाणे अधिक योग्य ठरते. शरीराला आवश्यक असणारी कॅलरी योग्य मिळते आणि त्याशिवाय दुपारच्या वेळी आपल्या शरीराची हालचाल अधिक प्रमाणात होत असते आणि चपाती लवकर पचू शकते. मात्र चपाती योग्य प्रमाणातच खावी.
गॅसवर चपाती भाजण्याचे नुकसान
वेळ वाचविण्यासाठी जर चपाती तुम्ही गॅसवर डायरेक्ट भाजत असाल तर तसं करणे आरोग्यासाठी चुकीचे ठरू शकते. गॅसवर चपाती भाजल्यावर त्यात भरणारी हवा ही शरीराला नुकसान पोहचवू शकते. त्यामुळे तुम्ही तव्यावर चपाती भाजणे अधिक योग्य ठरते.
तुम्ही जर घरी गॅसच्या आगीच्या ज्वाळांवर भाकरी, चपाती किंवा फुलके भाजत असाल तर सावधान. ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरणारे आणि तुम्हाला कॅन्सरच्या दारात घेऊन जाणारे ठरेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
आपल्याकडे दररोजच्या जेवणात चपाती, पोळी किंवा फुलके, भाकरी हा अविभाज्य भाग आहे. भाकरी, चपाती, फुलके बनवण्याची पद्धतही आपल्या देशभरात सारखीच आहे. मात्र, ती चांगली भाजली जावी, खमंगपणा यावा म्हणून आजही चपाती, भाकरी, फुलके चुलीच्या ज्वाळा किंवा विस्तव अथवा निखाऱ्यावर भाजली जाते. अशा प्रकारे भाजलेली चपाती, भाकरी खायलाही चवदार लागत असते. मात्र, हल्ली हे भाजण्याचे काम गॅसवर केले जाते. बाजारात हल्ली मिळत असलेल्या चिमट्यांमुळे हे आणखी सोपे झाले आहे. परंतु अशा भाजलेल्या चपातीमधून तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, असे एका संशोधनातून पुढे आले आहे.
गॅसच्या आगीवर भाकरी, चपाती, फुलके असे भाजल्याने नेमके काय होते?
गॅसमधून निघणाऱ्या ज्वाळांवर भाजल्याने भाकरी-चपातीमध्ये हेट्रोसायक्लिक अमाइन्स आणि पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स तयार होतात, यांना कार्सिनोजन्स असे म्हणतात. या घटकांच्या सेवनामुळे मानवाला कॅन्सर होण्याचा धोका असतो. पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित न्यूट्रीशन अँड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असाच दावा करण्यात आला आहे.
गॅसवर चालणाऱ्या शेगडीतून निघणाऱ्या ज्वाळांमधून कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइज आणि सूक्ष्म कण बाहेर पडतात. हे पदार्थ थेट चपातीमध्ये शिरत असतात, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हे घटक आरोग्यासाठी घातक आहेत. यामुळे मानवाला श्वसनासंबंधी आणि हृदयासंबंधीचे विकार होऊ शकतात, तसेच कॅन्सर होण्याची भीती असते.
थेट ज्वाळांवर भाजताना गव्हामध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि प्रोटिन्स एकत्रितपणे गरम होऊन यातून तयार होणारे एक्रिलामाइड हे रसायन शरीरासाठी घातक असते. कित्येक वर्षांपासून चुलीवर स्वयंपाक करत असताना निखार्यावर भाकरी, चपाती भाजली जाते. पण याची कुणालाही कल्पना नाही की अशीच कृती जर तुम्ही गॅसवर केली तर आपल्या जीवाला धोका ठरू शकतो. त्यामुळे भाकरी चपाती खमंग होण्यासाठी किंवा कडक होण्यासाठी अशी कृती करत असाल तर ते टाळा, असं कॅन्सर हॉस्पिटल डॉ.बी.के. शेवाळकर यांनी म्हटलं आहे.
आपला आहार आपल्या तंदुरुस्त शरीरासाठी महत्त्वाचा असतो. मग तो आहार घेताना त्याचा आघात आपल्या शरीरावर झाला तर तसा आहार घेऊन फायदा तरी काय? म्हणून भाकरी चपाती छान तयार व्हावी, यासाठी तव्यावर भाजतानाच चपातीला हलक्या कपड्याने दाबावे. यामुळे चपाती सर्व अंगांनी नीटपणे भाजली जाते. चपाती थेट ज्वाळांमध्ये भाजण्याची गरज पडत नसल्याचा सल्ला तज्ञांनी दिलाय. त्यामुळे तुमच्याकडे चूल किंवा निखारे नसतील तर उगीच गॅसच्या ज्वालावर भाकरी आणि चपाती भाजून कॅन्सरला आपल्या दारात ओढू नका.
चपाती ही जितकी शरीराला आवश्यक आहे तितकी अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याचे प्रमाण आणि वेळ पाळल्यास वजन वाढणार नाही






