यवतमाळ

समाजाचे ऋण फेडणे हीच खरी दिवाळी ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे।

समाजाचे ऋण फेडणे हीच खरी दिवाळी ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे।

रूस्तम शेख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

पुसद तालुका :- दिवाळीचा सण आला,सर्वानी पाहिजे केला,परि पाहावा कोण राहिला, भुकेला घरी। दिवाळीचा सण सर्वांनी उत्साह व आनंदाने साजरा करावा परंतु मनुष्य हा समाजशील प्राणी असून आपण समाजाचे देणे लागतो ही भावना विसरून तो स्वार्थी व आत्मकेंद्री झाला असून भौतिक सुखात समाधान शोधतो ते मिळत नाही कारण आपल्या महापुरुष व संतांनी रंजल्या गांजल्या, आर्थिक दुर्बल, अनाथ, वंचितांना मायेचा आधार देऊन त्यांच्या निष्काम सेवेतच सुखाची प्राप्ती सांगितली अश्या वंचित घटकांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता अविट समाधान देऊन जाते असे उपक्रम गावोगावी व्हावे असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे यांनी सिद्धिविनायक मंदिर श्रीरामपूर ( ता पुसद )येथे केले। पतंजली योग समिती अंतर्गत चालणाऱ्या श्री सिद्धिविनायक योग वर्गातील मुक्तेश्वर पदमावार व योगसाधकांमार्फत ऋण समाजाचे या उपक्रमाअंतर्गत समाजातील अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित बालकांना दिवाळीपूर्वी त्यांच्या पसंतीचा नवीन ड्रेस व दिवाळीचा फराळ देण्यात येतो यावर्षीची ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ह्यावेळी सिद्धिविनायक ट्रस्ट श्रीरामपूर चे अध्यक्ष दिलीप देशमुख अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी म्हणून भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी दिनेशजी राठोड, कृषिभूषण दीपक आसेगावकर,पुसद शहर पोलीस स्टेशन ठाणेदार प्रमेशजी आत्राम, समाजभूषण राजेश आसेगावकर, माजी शिक्षणाधिकारी रंगराव काळे, संदीप जिल्हेवार, पतंजली योग समिती तहसील प्रभारी प्रकाश वानरे, सौ विजयाताई आसेगावकर, पतंजली योग समिती महिला प्रभारी सौ माधुरी वानरे उपस्थित होते याप्रसंगी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, वंचित घटकातील तब्बल पन्नास 50 मुलामुलींना त्यांच्या पसंतीचे नवीन ड्रेस व दिवाळीचा फराळ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। पुढील वर्षाकरिता 100 ड्रेस वाटपाचे लक्ष निर्धारित करण्यातआले असून पुढील वर्षाकारिता दीपक आसेगावकर यांनी 11 ड्रेस, दिनेश राठोड यांनी 10 ड्रेस, गणेश धर्माळे यांनी 5 ड्रेस, रंगराव काळे यांनी 5 ड्रेस, संदीप जिल्हेवार यांनी 5 ड्रेस देण्याचे जाहीर केले यावेळी पतंजलीचे सर्व योगशिक्षक, योगसाधक व पदाधिकारी तसेच श्री सत्यसाई सेवा समितीची मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तेश्वर पदमावार, प्रा शरद राऊत, विनय व्यवहारे, बालाजी बंडेवार,विजय ठाकरे, अशोक बोबडे, बळीराम राठोड, अशोक महाजन तसेच सौपुष्पा पदमावार,वनिता धकाते, कल्पना बंडेवार,आरती राठोड, प्रतीक्षा ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा पं सदस्या माधुरीताई आसेगावकर यांनी

केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button