Yawatmal

निर्मिती उपजीविका केअर द्वारा चापर्डा येथे महिला मेळावा संपन्न…

निर्मिती उपजीविका केअर द्वारा चापर्डा येथे महिला मेळावा संपन्न…

रूस्तम शेख यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ जिल्हयातील कळंब तालुक्यात निर्मिती उपजीविका केअर,चापर्डा व्दारा चापर्डा येथे महिलांचा सर्वांगिण विकास व्हावा , व्यसनमुक्ती, महिलांना स्वतंत्र हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने महिला दिना निमित्त महिला मेळावा डॉ प्राचीताई नेवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सौ.पुजाताई बाळासाहेब मूनगीनवार, तर प्रमुख पाहुणे सौ.स्मिता भोयटे मॅम, सौ.रुपालिताई बेहरे (नायब तहसीलदार),सौ.रागिणी चौधरी,सौ.वनमाला चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

निर्मिती उपजीविका केअर एक असे व्यासपीठ आहे त्याची आजच्या काळात बेरोजगार महिला यांना “हाताला काम-पोटाला अनाज”ह्या उद्देशाने विकसित कार्यक्रम करून वनउपज जसे-मोहा,चारोळी,तेंदूपत्ता,बांबू,हिरडा,बेहरडा,आवळा,रानभाज्या ई. यांवर प्रक्रिया करून विविध प्रकारचे खाद्य पदार्थ उत्पादित करून लघुउद्योग समूह तयार करून विकसित कार्य करतात आणि ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक सौ पुजाताई मुनगिनवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले
एकीकडे सरकार करोडो रुपये देऊनही बचत गट उद्योग स्थापन करण्यात असमर्थ असतात त्याचकडे शासनाची कोणत्याही प्रकारची मदत न घेता निर्मिती उपजीविका केअर यांनी निर्मिती महिला लघुउद्योग समूह स्थापन करून शेकडो महिला रोजगारिक बनविल्या असे कौतुकास्पद उदगार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ स्मिता भोयटे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले .
तर या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्राचीताई नेवे यांनी महिलांच्या आरोग्यावर व्याख्यान देऊन महिलां सोबत त्यांच्या समस्यांवर चर्चा विमर्ष करून प्रामुख्याने उपाय योजना कशा कराव्यात यावर विषया वर सखोल मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सुत्र संचालन निर्मिती उपजीविका केअर चे संचालक डॉ विवेक चौधरी यांनी केले
या प्रसंगी बहुसंख्य महिला उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button