Faijpur

आगामी काळात होणाऱ्या रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे चार जण इच्छुक

आगामी काळात होणाऱ्या रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे चार जण इच्छुक

फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

येथील आगामी काळात होणाऱ्या रावेर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपातर्फे प्रमुख्याने चार जण इच्छुक असून अमोल जावळे शरद महाजन डॉक्टर कुंदन हेगडे भरत महाजन यांचा समावेश आहे

आगामी काळात होणाऱ्या रावेर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे अनेक जण जरी इच्छुक असले तरी या मतदारसंघात प्रमुख्याने स्वर्गवासी माजी खासदार आणि या मतदार संघात तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे तसेच माजी गृहराज्यमंत्री तसेच स्वर्गवासी जेटी महाजन यांनी सर्व जीवन निस्वार्थपणे सहकार क्षेत्राच्या उभारणीसाठी समप्रीत केले म्हणून त्यांची सहकार महर्षी म्हणून ओळख आहे
यांचे पुत्र मा जिल्हा परिषद सदस्य शरद महाजन तसेच डॉक्टर कुंदन फेगडे व भरत महाजन हे चार जण रावेर मतदार संघात इच्छुक असून स्वर्गवासी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा दिला म्हणून त्यांची कृषी मित्र म्हणून ओळख झाली त्यांचे निधन झाल्यापासून त्यांच्या वारसा म्हणून त्यांच्या पाठोपाठ यांचे पुत्र अमोल जावळे यांनी रावेर मतदार संघात अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे अमोल जावळे हे रावेर मतदार संघासाठी इच्छुक असून ते दावेदार मानले जात आहे तसेच स्वर्गवासी माजी गृहराज्यमंत्री जे टी महाजन त्यांचे पुत्र मा जिल्हा परिषद सदस्य शरद महाजन यांना एक संधी मिळावी अशी मागणी रावेर मतदार संघात आहे ते गेल्या अनेक वर्षापासून रावेर मतदार संघात अनेक शिक्षण संस्था सह सहकारात अग्रेसर मानले जातात त्या माध्यमाने ते नागरिकांच्या विविध समस्या यशस्वीपणे सांभाळत आहे

तसेच डॉक्टर कुंदन फेगडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांच्या माध्यमाने ते या मतदारसंघात निस्वार्थपणे सेवा करीत असून त्या माध्यमाने ते अनेक सामाजिक कार्यकरून जन सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवत त्यांनी रावेर मतदार संघात यशस्वीपणे स्थान मजबूत केले आहे त्यामुळे ते रावेर मतदार संघात भाजपा तर्फे इच्छुक असून ते या मतदारसंघात दावेदार मानले जात आहे

तसेच यावलचे माजी पंचायत समिती सभापती भरत महाजन यांनी रावेर मतदार संघात अनेक गरजू विधवा महिलांना पेन्शन योजनेचा लाभ त्यांच्या प्रयत्नाने मिळवून दिलेला आहे तसेच नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्न करीत असतात म्हणून ते रावेर मतदार संघात लोकप्रिय मानले जातात ते नागरिकांच्या समस्या सोडविण्यात परिचित आहे या रावेर मतदार संघात जरी अनेक जण इच्छुक असले तरी हे चार जण या रावेर मतदार संघात खरे दावेदार मानले जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button