Paranda

रुग्णांची अडचण सोडवीण्या साठी शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची रात्री ११ वाजता रूग्णालयात धाव मै हु ना काळजी करू नका म्हणत नातेवाईकांना दिला धिर

रुग्णांची अडचण सोडवीण्या साठी शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची रात्री ११ वाजता रूग्णालयात धाव मै हु ना काळजी करू नका म्हणत नातेवाईकांना दिला धिर
सुरेश बागडे परंडा
परंडा : तालूक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसे दिवस वाढतच असल्याने रुग्णालयात गर्दी झाली असुन ऑक्सीजी बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक हतबल झाले आहे .
ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकांने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना दि ४ एप्रील रोजी रात्री ११ वाजता फोन केला ज्ञानेश्वर पाटील यांनी रात्री ११ वाजता उप जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन रूग्णाला ऑक्सीजन बेड उपलब्ध करून दिला व नातेवाईकांना धिर दिला व डॉ कुलकर्णी व डॉ पठाण यांच्याशी चर्चा केली .
ऑक्सीजन मिळवीण्या साठी मोठी कसरत करावी लागत असल्याने उप जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन चे जम्बो सिलेंडर बसवीन्याची सिस्टम तात्काळ बसवा अश्या सुचना ज्ञानेश्वर पाटील यांनी दिल्या.
परंडा उप जिल्हा रुग्णालया साठी तुळजापुर तालूक्यातील तामलवाडी येथून ऑक्सीजन पुरवठा होत आसुन
जिल्हाभरात ऑक्सीजनची मागणी वाढल्याने सिलेंडर घेण्यासाठी नंबर साठी ताटकळत बसावे लागते ऑक्सीजन वेळेत नाही पोहचल्यास अनेक रूग्णांच्या जिवीताला धोका निर्माण होत आहे .
अश्या या कठीण काळात वेळेवर ऑक्सीजन वाहतुक करून रुग्णासाठी पुरवठा करणारे परंडा शहरातील बाबा गॅरेज चे मालक आरीफ शेख , व त्यांचा भाऊ शरीफ शेख हे दोघे विना मोबदला रमजान चा रोजा असताना परिश्रम घेत आहेत त्यांच्या सहकार्याला वाहन चालक आजीम मुजावर हे जिवाची बाजी लाऊन काम करीत आहे ऑक्सीजन बॉय म्हणुन त्यांची ओळख पुढे येत आहे .
रूग्णासाठी ऑक्सिजन सप्लाय साठी उप जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी जाधव व त्यांचे सहकारी २४ तास कार्यरत आहेत .
तालूक्यातील कोरोना आटोक्यात आणन्या साठी तालूका आरोग्य आधिकारी डॉ सय्यद तसेच उप जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पठाण डॉक्टर कुलकर्णी यांच्या सह आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत .
उप जिल्हा रुग्णालयातील ५० रूग्ण ऑक्सीजन वर असुन दर २० मिनटाला एक सिलेंडर लागत २४ तासात ७० ते ८० सिलेंडर ची गरज पडत आहे .
कोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी प्रशासन रस्त्यावर उतरले असुन नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याने महसूल , पोलिस , नगर परिषद प्रशासनाच्या संयूक्त पथकाने नियम तोडणाऱ्या वर कारवाई केली आहे .
दि ५ मे रोजी पासुन प्रशासनाने धोरण आधिक कडक केले आहे पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे सहाय्यक पोलिस निरिक्षक ससाने , तसेच ,नायब तहसिलदार मिलींद गायकवाड , मंडळ आधिकारी पाटील , तलाठी चुकेवाड व नगर परिषदेच्या पथकाने नियम मोडणाऱ्या नागरीकावर कारवाई केली .
परंडा तालूक्यातील रुग्ण संख्या वाढली असून तालूक्यातील ५४१ कोरोना रूग्णावर उपचार सुरू आहे तर एकुन ९९ रुग्णांचा मुत्यू झाला आहे .
परंडा तालूक्यातील काळेवाडी , देऊळगाव कुक्कडगाव, , अरणगाव , , चिंचपुर बुद्रक अनाळा, शेळगाव, शिराळा ,वाटेफळ , साकत बुद्रुक ,रोसा , खंडेश्वरवाडी , घारगाव
या गावात कोरोना रूग्ण संख्या वाढल्याने १३ गावे हॉट स्पॉट झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button