Jalgaon

अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी..

अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी..

प्रतिनिधी: रजनीकांत पाटील
जळगाव प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सद्या सुरू असलेल्या अंतिम वर्ष / अंतिम सत्र (बॅकलॉगसह) परीक्षेपासून विविध कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

उन्हाळी २०२० मधील अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या बॅकलॉगसह परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सूरू झाल्या आहेत. या परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने घेतल्या जात आहेत. जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करूनही अपरिहार्य कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहिले आहेत, अशा सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यू पॅटर्ननुसार फक्त ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती यथावकाश कळवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील ऑनलाइन परीक्षा समन्वयकांशी संपर्क साधावा, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button