Amalner

बेकायदेशीर दुकान वाढवून नियमांची पायमल्ली करणाऱ्या मेडिकल दुकानावर फौजदारी पात्र गुन्हे दाखल करा…सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम

बेकायदेशीर दुकान वाढवून नियमांची पायमल्ली करणाऱ्या मेडिकल दुकानावर फौजदारी पात्र गुन्हे दाखल करा…सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम

टी.पी. नं.१२४ मधील विजय मेडिकल यांनी दक्षिण बाजूस अनाधिकृतरित्या बांधकाम सुरु केल्या कारणे दंडात्मक व टाउन प्लानिंग च्या नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी न.पा. तर्फे फौजदारी पात्र गुन्हे दाखल होणे बाबत…

वरील विषयाकारणे आपणास नगरपरिषदेच्या मालमत्तेची हानी व नागरीक हितास्तव
विनंतीपूर्वक अर्ज करणे क्रमप्राप्त समजतो ते येणेप्रमाणेमहोदय, टी.पी. नं.१२४ ( लालबाग शॉपिंग सेंटर ) येथील विजय मेडीकल नामक व्यवसायिकाने दुकानाच्या दक्षिण बाजूस चहावाला यास हाकलून लावून त्या जागेवर अतिक्रमणीत बांधकाम सुरु केलेले असून नगरपरिषद बांधकाम विभागात अतिक्रमणीत बांधकाम संदर्भात विचारणा केली असता नगरपरिषदेकडून त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही असे प्रथमदर्शनी समजते. तसेच याबाबत माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती मागणी केलेली आहे पण नगरपरिषदेकडून अद्याप खुलासा देण्यात येत नसल्याने व्यथित होऊन मला सदरील अतिक्रमणीत
बांधकामा संदर्भात तक्रार अर्ज देणे बंधनकारक वाटले.
सदरील व्यावसयिक कर्ता ( विजय मेडिकल ) हा कुबेराशी स्पर्धा करणारा असून
चिरीमिरी देऊन त्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तोंड बंद केले असल्याचा आम्हास संशय आहे. याकारणे त्यांनी या अक्षम्य बाबीकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण धरलेले दिसते. तरी सदरील ही बाब महाराष्ट्र नगररचना अधिनियम आणि न.प.न.पं.व.औद्यो.नगरी अधि.१९६५ चे कलम- १८९, १८९-अ नुसार बेकायदा तथा फौजदारी पात्र गुन्ह्यात मोडणारी बाब आहे. या संदर्भात चौकशी करून संबंधित व्यावसायिकावर फौजदारी पात्र गुन्हे दाखल होणे क्रमप्राप्त आहे.
नगरपालिका मालमत्ता हस्तांतरण न.पा.अधिनियम-९२ च्या तरतुदीनुसार देखील
टी.पी. नं.१२४ मधील विजय मेडिकलचे दक्षिणेकडील अतिक्रमणीत बांधकाम विकास नियंत्रण नियमावली, विकास आराखड्याशी सुसंगत नाही व कायदेशीर देखील नाही.
त्याकारणे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-१९६५
चे कलम-४४ (१) (इ) प्रमाणे तात्काळ कार्यवाही होणे क्रमप्राप्त आहे.

वरील तक्रारीचे गांभीर्य नघुन कायद्याची पायमल्ली करणा-यांवर आपण चौकश
करून दंडात्मक कारवाई करणार अशी अपेक्षा बाळगतो. जेणेकरून, भविष्यात मे. सरकारच्या नगरपरिषद नियमांची पायमल्ली होणार नाही व कायद्याचा वचक कायद्याचा सन्मान नागरीका मध्ये राहील..अश्या आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी जिल्हाधिकारी यांच्या सह अमळनेर न प चे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

टी. पी नंबर -124 मधील विजय मेडिकल यांनी टाऊन प्ल्यानिंग व नगरपरिषदा औद्योगिक नगर पंचायती नियमांना धतुरा दाखवत दुकानाच्या (मागील )दक्षिण बाजूस अतिक्रमणित बांधकाम सुरु केले तरी यावर अमळनेर नगरपरिषद मधील एकही अधिकारी बोलायला तयार नाही.
तरी या बेकायदा बाबी संधर्भात सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत निकम यांनी अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. सरोदे साहेब यांना भेट तथा निवेदन देऊन सदरील बेकायदा बांधकामची चौकशी करून शासकीय मालमत्तेची मोडतोड प्रकरणी फौजदारी पात्र गुन्हा संमंधित व्यवसायिकावर दाखल करावे व झालेले बांधकाम तात्काळ निष्काशीत करावे अश्या स्वरूपाचे पत्र दि.15/9/2021 रोजी दिले आहे.
या विषयाची आदेशासाठी माहितीस्तव प्रत त्यांनी प्रधानसचिव मुंबई,आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव यांना केलेली आहे.
तसेच बेकायदा बांधकाम प्रकरणी न. पा. अमळनेर भाडेकरू कराराचा भंग केल्याने नगरपरिषद अमळनेर यांनी सदरील विजय मेडिकल हे दुकान सील करून खाली करण्याची कायदेशीर नोटीस दिली पाहिजे. तसेच सदर दुकानदारावर नियम उल्लंघन प्रकरणी कायदेशीर कार्यवाही होणार का? हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून ह्या संदर्भात मुख्यधिकारी गुन्हा करतील का? नगराध्यक्ष आणि तथाकथित विद्यमान नगरसेवक आणि इतर हे बोलणार नाहीत का? कि चिरी मिरीच्या जोरावर सर्व जैसे थे सुरु राहील? ही चिरी मिरी आहे तरी किती मोठी ?असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button