Arondol

कर्जाला कंटाळून कढोली येथील शेतकऱ्याची आत्महत्या !

कर्जाला कंटाळून कढोली येथील शेतकऱ्याची आत्महत्या !

विकी खोकरे एरंडोल

एरंडोल : सततची नापिकी व अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या कढोली येथील ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . याबाबत माहिती अशी की , एरंडोल तालुक्यातील कढोली येथील वयोवृद्ध शेतकरी धनराज अभिमन पाटील वय ६५ वर्षे हे सततची नापिकी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे या आर्थिक विवंचनेत होते . आज सकाळी सात वाजेच्या सुमारास धनराज पाटील आंघोळ करून गावातच असलेल्या नवीन घरी गेले त्यानंतर त्यांनी घरातील छताच्या कडीला दोर लावून गळफास घेऊन आत्महत्या केली . धनराज पाटील यांचा मुलगा कमलाकर धनराज पाटील हा शेतातून घराकडे येत असताना त्यास नवीन घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसल्याने तो घरात गेला असता वडिलांनी गळफास घेतल्याचे त्यास दिसून आले . कमलाकर पाटील याने आरडा – ओरड केल्यामुळे ग्रामस्थ जमा झाले धनराज पाटील यांना खाली उतरवुन त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले . धनराज पाटील यांचे वर सोसायटीचे व खाजगी कर्ज होते , कोरोनामुळे मुलाला देखील कंपनीत काम मिळत नसल्यामुळे ते चिंताग्रस्त होते . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा व दोन मुली असा परिवार आहे . याबाबत डॉक्टर प्रवीण पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली राजेश पाटील , रा बैसाणे , संदीप सातपुते , जुबेर खाटीक हे अधिक तपास करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button