Maharashtra

जून पर्यंत विज बिल भरण्यास मुदतवाढ द्या शिवसेना आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी

जून पर्यंत विज बिल भरण्यास मुदतवाढ द्या शिवसेना आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि.०२

कोरोना वायरस मुळे घाबरून न जाता,त्यांवर मात करण्यासाठी आरोग्याची काळजी घ्या सध्या कोरोना वायरस हें संपूर्ण जगासमोर राष्ट्रीय आपत्ती म्हणून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या देशा देशात-प्रांतांमध्ये पोहोचला आहे.कोरोना वायरस मुळे सर्व ग्रामीण भागाची नव्हे तर सर्वाचीच आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे.प्रत्येकाच्या आर्थिक प्रगतीला धक्का बसला आहे.

त्यामुळे या राष्ट्रीय संकटात महावितरण थकीत वीज बिलासाठी जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी माजी जलसंधारणमंत्री शिवसेनेचे उपनेते डॉ. तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की गेली दोन आठवडे लॉकडाऊन असल्यामुळे ग्रामीण भागातील छोटे-मोठे उद्योगधंदे ,सर्व व्यापारी दुकाने, लघुउद्योग बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या गरीब जनतेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

त्यामुळे घरगुती ग्राहक ,शेतकरी ग्राहक, औद्योगिक व्यवसाय ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करू नये तसेच ऊर्जा खात्याने शासकीय लेखी आदेश काढून घरगुती ग्राहक ,शेतकरी ग्राहक, औद्योगिक यांना पुढील तीन महिने जून पर्यंत विज बिल भरण्यास मुदतवाढ द्या अशी मागणी आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button