Faijpur

फैजपूर बंदला संमिश्र प्रतिसाद पोलिसांचा चोख बंदोबस्त

फैजपूर बंदला संमिश्र प्रतिसाद
पोलिसांचा चोख बंदोबस्त

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील महाविकास आघाडीच्यावतीने आज फैजपूर शहर बंद पुकारण्यात आले होते सोमवार रोजी फैजपूर शहरातील सर्व व्यापारी बांधवांना विनंती की, आज फैजपूर शहर बंद रहाणार आहे, तरी व्यापारी वर्गाने याची नोंद घ्यावी. व सहकार्य करावे, अशी विनंती.महाविकास आघाड्यांच्या पक्षाद्वारे करण्यात आली होती यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या युवतीने
लखीमपूर खेरी सिमेवरील आंदोलक शेतकऱ्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री यांच्या गाड्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याप्रसंगी त्यां रागाच्या भरात या हुकुमशहा व गुंड प्रवृत्तीच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाच्या ताफ्यामध्ये असलेल्या गाडीने चार शेतक-यांना चिरडून ठार मारण्यात आले, बारा शेतकऱ्यांना गाड्यांखाली चिरडण्यात आले. त्यासाठी केंद्र सरकारचा निषेध करुन दोषीवर गुन्हा दाखल करण्याची व आरोपीच्या अटकेची मागणी करण्यासाठी व मृत शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी व आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सर्व राजकीय व आघाडी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्व शेतकरी व शेतकरी संघटना व विविध संघटनांना पाठिंबा दिला होतं या बंदमध्ये शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्ते म्हणूनच सहभाग घेतला होता प्रभाकर चौधरी आप्पाचौधरी योगेश भावसार राजू काटोके युवक काँग्रेसचे वसीम तडवी आदी सहभागी झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फैजपूर पोलिस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखे गावकर यांच्यासह पीएसआय लोखंडे ए एस आय हेमंत सांगळे पोलिस कर्मचारी किरण चाटे चेतन महाजन दिनेश भोई बाळू भोई उमेश वंजारी विनोद चौधरी यांच्यासह पोलिस स्टाफ होमगार्डस पथक हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button