Dhule

कोडीद ता.शिरपूर येथे ‘मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी.!

कोडीद ता.शिरपूर येथे ‘मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी.!

राहुल साळुंके धुळे

धुळे : मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास कार्यक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यांत सुरू केला आहे. त्यात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले. याप्रमाणे प्राधान्याने कुपोषित बालके, कमजोर माता, गरोदर महिला यांची परिपूर्ण तपासणी,त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्यानुसार उपचाराची सुविधा करणे अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव कऱण्यात आला आहे.

ह्यानुसार कोडीद येथे शासकीय आश्रम शाळा कोडीद येथे आज “मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, बोराडी व उपकेंद्र, कोडीद अंतर्गत ७२ गरोदर माता व बालके ० ते ६ महिने मधील २४ व ६महिने ते २ वर्षांपर्यंत २९ बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.

ह्यावेळी स्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, उपकेंद्र कोडीद व प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा वर्कर्स कर्मचारी तसेच सर्व कर्मचारी ह्यांचे उपकेंद्र कोडीद व प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथील कर्मचारी उपस्थित होते.

ह्यावेळी उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button