Pune

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल,आकुर्डी याठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल,आकुर्डी याठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा

पुणे आकुर्डी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी या ठिकाणी या वर्षी गणेशोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात उत्साहाने साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे व निर्बंधांमुळे गणेशोत्सव या उत्साहाच्या सणाच्या आनंदापासून विद्यार्थी वंचित होते, परंतु यावर्षी तो द्विगुणित उत्साहासह साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘नॅशनल एन्व्हायरमेंट फ्रेंड्स मल्टी परपज ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या संस्थेच्या विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचा उपक्रम विद्यालयामध्ये राबवण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून अनेक सुबक, सुंदर मूर्ती बनविल्या व ‘मिशन फॉर सेविंग अर्थ’ यासाठी योगदान दिले. या पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमासाठी या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांच्या सहयोगाने हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला व त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबतीत जागृती करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात प्रथमच श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून श्रीगणेशाची प्रार्थना तसेच आरती करून मनोभावे पूजा-अर्चा करण्यात आली. प्राचार्या प्रिती दबडे यांच्या संकल्पनेतून हरित गणेशाची प्रतिमाही जमिनीवर साकारण्यात आली. मातीमध्ये बीज पेरून त्यांना दररोज पाण्याचा शिडकावा देऊन मातीतून हरिततृण वाढविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी ही एक अनोखी गणेश प्रतिमा होती. ती सर्वांनी मोठ्या कुतूहलाने पाहिली, तसेच त्यातून ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाचे सदस्य विद्या गजरे, ज्योती बोंद्रे, संगीता वनवे, मंदार देसाई, सुनिता साळुंखे, रूपाली संत यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button