Amalner

न्यु व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पर्यावरण पुरक दिवाळी साजरी.

न्यु व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पर्यावरण पुरक दिवाळी साजरी.

दिवाळी सणाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचे तीन गट विभागण्यात आले होते.पहिल्या गटात १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी कागदाव घोटीव कागदापासुन , टाकाऊ वस्तुंपासुन ,घरातील ऊपलब्ध सामग्री पासुन तोरण बनविले.

दुसर्या गटात इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी शाडु माती पासुन दिवे बनविले,दिव्यांना सजविणे, दिवा कलर करणे, हा उपक्रम राबविला.

तिसर्या गटात इयत्ता ८वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी कागदापासुन विविध रंगाचे व वेगवेगळ्या आकाराचे आकाशकंदिल बनविले.

या उपक्रमासाठी मुलांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमासाठी शालेय शिक्षिकांनी दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसाचे महत्व सांगीतले. व सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.पर्यावरणपूरक दिवाळीसाजरी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका प्रेरणा पाटील, स्नेहा एकतारे, दीपाली राजपूत, कविता शिसोदे, विद्या पाटील, अश्विनी पाटील, कामिनी महाजन, वंदना मराठे, दीपाली पाटील, मयुरी नेतकर, कविता पाटील यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button