Dhule

धुळे येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी; जिजामातेच्या आदर्श विचारांची घेण्यात आली शपथ.

धुळे येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी; जिजामातेच्या आदर्श विचारांची घेण्यात आली शपथ.

असद खाटीक धुळे

धुळे : धुळे शहरातील संतोषी माता चौक स्थित शिवतीर्थावर राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, सुरुवातीस जिजामातेच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले तर उपस्थित महिला पदाधिका-यांच्या वतीने जिजामातेच्या आदर्श विचारांची शपथ यावेळी घेण्यात आली, यावेळी मालती पाडवी यांना यावेळी राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आले..
धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे या आशयाची शपथ यावेळी महिला पदाधिका-यांच्या वतीने घेण्यात आली..

यावेळी महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ. सुवर्णा शिंदे,जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम, मालती पाडवी, तरुणा पाटील, संजीवनी पाटील, सुवर्णा लाड, सरोज पवार,वैशाली खैरनार, दिपिका बुदेका, आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्यात.

सौ. सुवर्णाताई शिंदे
निरीक्षक राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, धुळे, जळगांव

सौ. ज्योती पावरा
जिल्हाध्यक्षा:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धुळे.

सौ. सरोजताई कदम
शहराध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी,धुळे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button