Maharashtra

Bank,सोसायटी,पतपेढीतील कर्मचारी सुध्दा कोरोना योध्दाचं ग.स.कर्मचारी पतसंस्थेचे संचालक..जगन्नाथ टि.बाविस्कर यांचे प्रतिपादन

Bank,सोसायटी,पतपेढीतील कर्मचारी सुध्दा कोरोना योध्दाचं
ग.स.कर्मचारी पतसंस्थेचे संचालक..जगन्नाथ टि.बाविस्कर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी लतीश जैन

केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणेच सहकारी क्षेत्रातील Bank,सोसायट्या व पतपेढ्यांमधील कर्मचारी सुध्दा कोरोना योध्दाचं आहेत.पोलीसअधिकारी,कर्मचारी,डॉक्टर्स,नर्सेस,सफाईकामगार,महामंडळातील कर्मचारी,पत्रकारबंधु हे आपल्या जिवाची बाजी लावुन कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत आहेत.लॉकडाऊन काळात कर्तव्य बजावत असतांना काहिंना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागत आहे.त्यांच्या परिवारातील वारसांना शासनातर्फे ५० लाखांचे विमा संरक्षण दिलेले आहे.
त्याचप्रमाणे सहकारी क्षेत्रातील Bank,सोसायटी,पतपेढ्यांमधील अधिकारी व कर्मचारी हे सुध्दा दररोज जीव मुठीत धरून काम करित असतात.शेकडो सभासद व ग्राहक आर्थिक कामानिमीत्त शाखाकार्यालयात येत असतात.अशावेळेस समुहसंसर्गाची भिती नाकारता येत नाही.यामुळे प्रत्येकाच्या घरपरिवारात काळजी,चिंता असते.म्हणुनच Bank,सोसायटी,पतपेढ्यांमधील कर्मचारी हेही कोरोना योध्दाचं असल्याने त्यांना सुध्दा ५० लाखांचे विमासंरक्षण मिळावे,अशी आग्रही मागणी जळगाव ग.स.मधील कर्मचारी पतसंस्थेचे संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर (विभाग,चोपडा) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
*चोपडेकरांनो सावधान…*
कोरोनाचा संसर्ग मुकेप्राणी व गुराढोरांना होत नसुन फक्त मानवजातीलाच याची लागण होत असते.परंतु दर रविवारी येथील गुरांच्या बाजारात गुरे कमी व माणसेच जास्त असल्याचे दिसते.बाहेरिल व्यापारी,स्थानिक दलाल व प्रत्येक गांवातील गुरांचे पारखीव्यक्ति बैलबाजारात गर्दी करित असतात.लॉकडाऊन असुन दररोजचा भाजीबाजार व शहरातील बाजारपेठेत सुध्दा दिवसेंदिवस गर्दिचे प्रमाण वाढत आहे.म्हणुनच की काय चोपडा शहर व ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.याची जबाबदारी शासन प्रशासनाची जरी असली तरी जनतेने योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या घरपरिवारातील निरपराध व्यक्तिंची काळजी घेतली पाहिजे.म्हणुनच चोपडेकरांनी सावधानता बाळगावी,असा इशारा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर (गोरगांवले बु.)यांनी ह्या पत्रकान्वये दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button