Mumbai

ड्रग्ज प्रकरण…आता समीर वानखेडे प्रकरणात सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची एन्ट्री..!

ड्रग्ज प्रकरण…आता समीर वानखेडे प्रकरणात सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची एन्ट्री..!

मुंबई आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांच्या वर आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाने अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बुधवारी चार तास चौकशी केली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मोठं पाऊल उचललं असून समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी जारी केलेत. त्यामुळे आता या आदेशानुसार मुंबई पोलीस स्वतंत्र्यपणे या वानखेडेंवरील आरोपांची चौकशी करणार आहेत.

ह्या चौकशी चे नेतृत्व अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी दिलिप सावंत करतील. या प्रकरणातील चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी हे आझाद मैदान, कुलाबा पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक तसेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील एक व अन्य एक अधिकारी सायबर सेल असे असणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button