Nashik

आशा स्वयंसेविकाना ग्रा. प.कडून प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने येवला प. समितीसमोर बेमुदत चुल्हा जलाव आंदोलनाला सुरुवात.

आशा स्वयंसेविकाना ग्रा. प.कडून प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने येवला प. समितीसमोर बेमुदत चुल्हा जलाव आंदोलनाला सुरुवात

नाशिक शांताराम दुनबळे

येवला नाशिक= आरोग्य विभागाच्या वतीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा कोरोना काळातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा खारीचा वाटा असून नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने या कालावधीमध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दरमहा एक हजार रुपये ग्रामपंचायत स्तरावरून देण्याचे जाहीर केले होते परंतु माहे एप्रिल 2020 पासून येवला तालुक्‍यात कुठेही आशा सेविकांना ग्रामपंचायत स्तरावरून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही यासंदर्भात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कृती समितीने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना विचारणा केली असता त्यांनी 17 /6/ 2021 रोजी गटविकास अधिकारी यांना आदेश देण्याचे पत्र काढले होते तरीही त्याअनुषंगाने मे 2020 पासून आज पर्यंत अद्यापही कोणत्याही ग्रा. प कडून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना थकित प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नसल्याने 3 .जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी स्री मुक्ती दिवस म्हणून महिलांचा गौरव केला जातो परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिलांना प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी पंचायत समिती समोर चुल मांडून प्रपंचाला लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तू मांडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक विजयजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत चुल पेटून स्वयंपाक करून आंदोलन करण्यात आले नाशिक जिल्हा संघटक विजयजी दराडे,
सुनंदा परदेशी, स्वाती चव्हाण भारती बनसोडे, वाल्हुबाई जगताप, सविता आहेर, संगीता राजगुरू, वर्षा भावसार, सविता कचोलिया, यांच्यासह शेकडो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button