Bollywood

Bollywood: अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यू चे रहस्य..!

Bollywood: अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यू चे रहस्य..!

बॉलीवूड अभिनेत्री दिव्या भारती हिचा मृत्यू आजही जगासाठी एक रहस्यच आहे. पण अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ५ एप्रिल १९९३ ला तिचा अचानक मृत्यू झाला. काहींनी तिचा मृत्यू अपघात तर काहींनी कट असल्याचे सांगितले आहे. वयाच्या १९ व्या वर्षी तिने शेवटचा श्वास घेतला आहे.
१९९२ मध्ये दिव्या भारतीने विश्वात्मा या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच, याआधी तिने तेलगू चित्रपटात काम केले होते. शोला और शबनम,
दिल का क्या कसूर, जान से प्यारा, दिवाणा, बलराम, दिल ही तो है, दिल आशना है, गीत या सिनेमांत तिने काम केले आहे. त्याकाळातील ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

दिव्याने मृत्यूच्या दिवशी मुंबईत ४ BHK घर विकत घेतले होते. घराचा करार सुद्धा झाला होता. दिव्याने तिच्या भावाला देखील ही बातमी दिली होती. त्याच दिवशी दिव्या चेन्नईहून शुटिंगहून मुंबईला आली. मुंबईतील अंधेरीतील वर्सोवा परिसरात तुलसी अपार्टमेंट मध्ये ती पाचव्या मजल्यावरआपल्या पतीसोबत राहत होती.
रात्री १० वाजता तिच्या घरी तिची मैत्रीण आणि फॅशन डिझायनर नीता लुल्ला आणि तिचा पती श्याम हे आले होते. तिघेही लिव्हिन्ग रूममध्ये बसून गप्पा मारत होते. बरोबरच मद्यपान देखील सुरु होतं. तसेच दिव्याची मोलकरीण अमृताही यामध्ये होती. अकरा वाजता काही कामासाठी अमृता किचन मध्ये गेली. नीता लुल्ला आणि तिचा पती टीव्ही बघण्यात गुंग होते.

तेंव्हा दिव्या हॉलच्या खिडकीच्या दिशेने गेली आणि अमृताशी मोठ्या आवाजात बोलत होती. तिच्या लिव्हिन्ग रूममध्ये बाल्कनी नव्हती ती एकमेव खिडकी होती. ज्याला ग्रील नव्हती. खिडकीत उभी असलेली दिव्या वळली आणि ती नीट उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा तोल गेला. आणि पाय घसरला आणि ती सरळ खाली जमिनीवर पडली. असे सांगितले जाते.
पाचव्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे ती रक्ताने माखली होती. तिला लगेच कूपर रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला. रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला.

तिच्या मृत्यूची अंतर्गत रक्तस्त्रावामुळे आणि डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे नोंद झाली. पोलिसांना पाच वर्ष तपास करून याबाबत काही कारण सापडलं नाही. दारूच्या नशेत बाल्कनीतून खाली पडली असे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button