Maharashtra

हिरड्या पाचशे रूपये हमीभाव दराने खरेदी करा बिरसा क्रांती दलाची पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे मागणी

हिरड्या पाचशे रूपये हमीभाव दराने खरेदी करा – बिरसा क्रांती दलाची पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे मागणी

प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

हिरड्याला पाचशे रुपये बाजार भाव मिळाला पाहिजे अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे राज्य सचिव डी.बी.घोडे ,पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या.नाशिकचे व्यवस्थपकीय संचालक नितीन पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर खेड मावळ या आदिवासीबहुल तालुक्यात राहतो त्या ठिकाणी आम्हाला उपजीविकेसाठी आहे पिक महत्वाचे आहे तरीही भारतीय संविधान ४६ नुसार अनुसूचित जाती जमाती साठी यांचा सामाजिक आर्थिक स्थर उंचावणे कामी आणि अन्याय अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी या घटकांचे राज्य सरकार प्राधान्याने विचार करणे असे नमूद आहे या कलमानुसार या आदिवासी भागातील शोषित वंचित आदिवासी शेतकऱ्यांच्या हिरड्याच्या पिकाला पाचशे रुपये किमान हमी भाव मिळावा.
हिरडा गोळा करताना आदिवासी बांधव आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो झाडाच्या शेंड्यावर जावून हिरडा झोडावा लागतो तो खाली पडलेला हिरडा पालापाचोळामध्ये गोळा करावा लागतो त्यामध्ये असे लक्षात येते की कधी कधी आदिवासी माणूस झाडावरून पडून आपला हात पाय मोडण्याची भीती असते तर कधी जीव गमवावा लागतो.
हिरडा हे पीक आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हिरड्याला आयुर्वेदांचा राजा असे संबोधले आहे तरी सध्या हिरडा या पिकावर आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह चालू आहे त्यामुळे या वाढत्या महागाई च्या काळात हिरडा या पिकाला पाचशे ते सहाशे रुपये किमान हमीभाव मिळावा व आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
आंबवणे म्हणाले, हिरडा जंगलातून तोडून आणल्यानंतर दररोज उन्हामध्ये वाळत घालावा लागतो पायाने मळावा लागतो तेव्हा तो चांगला तयार होतो तेव्हा कुठेतरी चांगला भाव मिळतो खुप कष्ट घ्यावे लागतात.हिरडाचा उपयोग अनेक औषधामध्ये केला जातो. जर औषधे जर महाग आहेत तर हिरडाला किमान ५०० रूपये भाव द्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button