Maharashtra

आषाढ़ी एकादशी निमित्त वढोदयात जिल्हाधिकारी ढाकने यांनी केली माउली ची महापूजा

आषाढ़ी एकादशी निमित्त वढोदयात 
जिल्हाधिकारी ढाकने यांनी केली माउली ची महापूजा

आषाढ़ी एकादशी निमित्त वढोदयात जिल्हाधिकारी ढाकने यांनी केली माउली ची महापूजा

चोपडा : प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आज दिनांक 12 रोजी आषाढ़ी एकादशी निमित्त श्री क्षेत्र प्रति पंढरपुर म्हटले जाणारे चोपडा तालुक्यातील वढोदा गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री पांडुरंगाची महापूजा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकने यांच्या हस्ते सकाळी 6 : 30 वा विधिवत पूजनाने करण्यात आली . यावेळी राज्य विधान सभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी 
यांच्या हस्ते सपत्नीक संत ज्ञानेश्वर , संत 
तुकाराम महाराजांची महापूजा करण्यात 
आली . याप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून
चोपडा तालुक्याचे माजी आमदार जगदीश
चंद्र वळवी , प्रांतअधिकारी श्रीमती सीमा 
अहिरे , चंद्रहास गुजराथी , घनशाम पाटील 
आशीष गुजराथी , दिलीप युवराज पाटील
तहसीलदार अनिल गावीत , जगनकाका 
पाटील, डी पी पाटील , अतुल ठाकरे ,
गिरिशआप्पा पाटील , नंदुआबा पाटील , जीवन चौधरी हिम्मतसिंग पाटील , नेमीचंद जैन , राजू देशमुख , हुसेनखा पठान आदि मान्यवर हजर होते .
  याधार्मिक कार्यक्रमाचे आयोजक वढोदा
गावचे रहिवासी गोकुळ पंढरीनाथ पाटील ,
विठ्ठल मंदिर समिति , विनायक मित्र मंडळ
व वढोदा ग्रामस्थ यांनी सुंदर नियोजन केले
माउली पूजन , काकड़ आरती , भजन या ,
विविध मांगलिक कार्यक्रमानी गावात उत्साहाचे , वातावरण तयार झाले . तदनंतर
गोकुळ आबा यांच्या निवास स्थानी सर्व प्रमुख अतिथि यांना उपवासाचा फराळ
देण्यात आला . 
शेठ नटवरलाल गुजराथी इंग्लिश मीडियम
शाळेचे भूमिपूजन
यावेळी घोड़गाव येथे सी बी निकुंभ हाईस्कूलच्या आवारात जिल्हाधिकारी
डॉ अविनाश ढाकने यांच्या हस्ते नियोजित
शेठ नटवरलाल गुजराथी इंग्लिश मीडियम
स्कूल या शाळेच्या इमारतीचे  भूमिपूजन 
करण्यात आले याप्रसगी घोड़गाव पंचक्रोशीतील नागरिक ,संस्थेचे संचालक 
मंडळ मोठ्या प्रमानात हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button