Champa

चांपा येथे प्रारब्ध फाऊंडेशन तर्फे विविध साहित्याचा वाटप कार्यक्रम

चांपा येथे प्रारब्ध फाऊंडेशन तर्फे विविध साहित्याचा वाटप कार्यक्रम

अनिल पवार

चांपा , ता ,१७:गट ग्रामपंचायत चांपा व प्रारब्ध फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच अतिश पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांपा गावांतील गोरगरीब वयोवृद्ध जनतेला “जन सेवा” हीच “खरी ईश्वर सेवा” या उपक्रमांतगर्त चांपा गावांतील गरीब गरजुना कपडे , चप्पल , साडी , धोतर , पातळ ,रुमाल , विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन व लहान मुलाना कपडे , गोड खाऊ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा वाटपाचा कार्यक्रम आज मंगळवारी ता , १७ सकाळी दहाच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रारब्ध फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहितदादा माडेवार होते .प्रमुख पाहुणे म्हणून रोटी फाउंडेशनचे अध्यक्ष टिशा माडेवार , तेजस बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार , भटक्या विमुक्त जनजाति व संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष दिनानाथ वाघमारे , आदिवासी पारधी जनसेवा संस्थेचे अध्यक्ष बबन गोरामन , नेकी फाउंडेशनचे अध्यक्ष सैय्यद अली , चांप्याच्या तलाठी प्रियांका अलोने , विजय विद्यालयचे मुख्याध्यापक नागदेवे उपस्थित होते .

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अतिश पवार प्रारब्ध फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहितदादा माडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांपा येथे पहिल्यांदाच आयोजन जीवनावश्यक वस्तूंचा वाटपाचा कार्यक्रमाचा लाभ गावांतील दोन विधवा महिला मालूबाई मडावी , तानाबाई घरत , याना प्रारब्ध फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहितदादा माडेवार यांच्यातर्फे शिलाई मशीन वाटप करण्यात आले .

गावांतील गरजू वयोवृद्दाना पातळ , साडी , कपडे, चप्पल , वाटपाचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घेतला व अध्यक्षीय भाषण करतांना प्रारब्ध फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहितदादा माडेवार यांनी चांपा या गावाला दत्तक घेण्याची घोषणा केली .व गावात नालंदा वाचनालयाला दोन कपाट , 15खुर्ची आदी वस्तू भेट दिले व वेळोवेळी गावाला मदत करीत असल्यामुळे सरपंच अतिश पवार व ग्रामपंचायत सदस्यानी रोहितदादा माडेवार यांना ग्रामपंचायततर्फे स्मूर्तिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .गावकऱ्यांनी सरपंच अतिश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध भेट वस्तू देऊन सत्कार केला .

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात येणाऱ्या लाभार्थ्यांना तोंडाला रुमाल मास्क बांधून कोरोना संसर्गाची जनजागृती करून सरपंच अतिश पवार यांनी कार्यक्रमाच्या सुरवात केली .कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सरपंच अतिश पवार यांनी केले व आभार मंगेश घरत यांनी मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button