Champa

चांप्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पंचायत समितीतर्फे जनजागृती व आरोग्य किटचे वितरण

चांप्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पंचायत समितीतर्फे जनजागृती व आरोग्य किटचे वितरण

चांप्यात पारधी टोलीवर गटविकास अधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग जनजागृती व आरोग्य किटचे वितरण

अनिल पवार

चांपा: कोरोना विषाणूपासून बचाव करायचा असेल तर काही पथ्य पाळावीच लागतील .याकरिता काही आरोग्यविषयक साधनांची गरज भासते .तीच गरज लक्षात घेता

पंचायत समिती उमरेड व निसर्ग विज्ञान मंडळ ग्रामायण तर्फे चांपा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पारधी टोलीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पंचायत समिती उमरेडचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अतिश पवार यांच्याहस्ते ३० पारधी कुटुंबीयांना मास्क ,डेटोल शाबून व सनिटायझरचे वाटप करण्यात आले .

नागपूर जिल्ह्यात सर्वत्र कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे पारधी समाजातील नागरिकांमध्ये उमरेडचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे यांनी कोरोना विषाणु संसर्ग विषयी मार्गदर्शन करून पारधी समाजामध्ये जनजागृती करण्यात आली .

यावेळी निसर्ग विज्ञान मंडळचे अध्यक्ष डॉ .विजय घुगे समन्वयक दीपक शाहू , तालुका आरोग्य अधिकारी डॉ .संदीप धरमटोक , उमरेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुभाष सानप व चांपा ग्रामपंचायतचे सरपंच अतिश पवार , ग्रामसचिव बि बि वैद्य , उपसरपंच अर्चना सिरसाम , उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button