Dhule

हॅकर्सच्या टीमचा धुळे पोलिसांनी केला पर्दाफाश

हॅकर्सच्या टीमचा धुळे पोलिसांनी केला पर्दाफाश

धुळे असद खाटीक

देशातील विविध बँकांमधून अकाउंट हॅक करून बँकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या हॅकर्स टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
धुळ्यातील एक्सिस बँकेतून दोन कोटी रुपये अचानक हॅक झाल्याची तक्रार धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर धुळे पोलिसांनी या बाबत चौकशी सुरू केल्यानंतर धुळे पोलिसांच्या तपासादरम्यान काही धक्कादायक माहिती समोर आली.
देशातील विविध बँकांमधील अकाउंट हॅक करणारी टोळी दिल्लीत सक्रीय असल्याची माहिती धुळे पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे पोलिसांनी या तपासासाठी एक पथक तयार करून दिल्लीकडे रवाना केले असता दिल्ली पोलिसांच्या मदतीने धुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता 5 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे.

यामध्ये तीन जण भारतीय असून एक आरोपी हा नायजेरियन आहे तर यामध्ये एका महिला आरोपी चा देखील समावेश आहे
धुळे पोलिसांनी या हायकर्स कडून 9 मोबाईल हँडसेट तसेच दोन नोटा मोजण्याचे मशीन,एक आयपॉड त्याचबरोबर एक डिजिटल लॉकर, विविध बँकांचे एटीएम कार्ड,पासबुक, चेक बुक असा एकूण 5,98,240 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पकडल्या गेलेल्या या आरोपींच्या व्यतिरिक्त देखील मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी व्यक्त केली असून यासंदर्भात पुढील तपास धुळे पोलिस करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button