Dhule

धुळे पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा केला पर्दापाश.

धुळे पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा केला पर्दापाश.

असद खाटीक

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून दोनशे रुपये किमतीच्या बनावट मोठा तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती, या माहिती च्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष गुलाब बेलदार राहणार कळमसरे यांच्या घरावर छापा टाकला या छाप्यात पोलिसांना बनावट नोटा तयार करणारी यंत्रसामुग्री बनावट नोटा संगणक मोबाईल बँकेचे पासबुक असा 48 हजार 307 रुपयांचा ऐवज आढळून आला आहे.

धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर पोलिसांच्या मदतीने हा बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त केला आहे. बनावट नोटा बनवणाऱ्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना रंगेहात अटक केली आहे. यात चौघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाईट: चिन्मय पंडित (पोलीस अधीक्षक, धुळे)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button