Dhule

धुळे शहरातील नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून येत असलेल्या अडी-अडचणी, जादा बिले, वारंवार विद्युत प्रवाह खंडित होणे अश्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या आमदार फारूक शाह यांच्या अधिकाऱ्यांना सुचना…

धुळे शहरातील नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून येत असलेल्या अडी-अडचणी, जादा बिले, वारंवार विद्युत प्रवाह खंडित होणे अश्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या आमदार फारूक शाह यांच्या अधिकाऱ्यांना सुचना…

असद खाटीक

धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी च्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन आमदार कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. यात धुळे शहरातील सर्वच विभागांमध्ये वेळी-अवेळी विद्युत प्रवाह खंडित होणे हे नित्याचेच झाले आहे. तसेच असे असतांना देखील आपल्या वीज वितरण कंपनी कडून जादा बिलाची आकारणी करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी या वाढीव वीज बिला बाबत वीज वितरण कंपनीकडे अनेक तक्रारी केल्या आहेत मात्र या तक्रारी अजुनही सोडविण्यात आलेल्या नाही. शहरातील नागरिकांना वीज वितरण कार्यालयात मोठ्या प्रमाणावर हेलपाटे घालावे लागत आहे. किरकोळ कामासाठी नागरिकांना २-२ दिवस फिरावे लागत आहे. त्याच प्रमाणे धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवद बाभळे पाणी पुरवठा योजना या ठिकाणी पंपिंग स्टेशनवर वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत असल्याकारणाने धुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो यावरही चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील वस्त्यांमधील पोल व तार स्थलांतरणासाठी वारंवार फोन करून तक्रारी करून कामास विलंब होतो या समस्या तात्काळ सोडविण्या बाबत आमदार फारूक शाह यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

सदर झालेल्या बैठकीत आमदार फारूक शाह, कार्यकारी अभियंता के. एस. बेळे साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.टी. पवार साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी.डी. साळुंखे साहेब, कनिष्ठ अभियंता निरजकुमार झां साहेब, कनिष्ठ अभियंता एस.जी. सावरकर मॅडम, कनिष्ठ अभियंता ए. वाय. रामटेके साहेब, कनिष्ठ अभियंता लोकेश चव्हाण साहेब, कनिष्ठ अभियंता भामरे साहेब, कनिष्ठ अभियंता नितेश हातागिरे साहेब, कनिष्ठ अभियंता रणधीर आगलावे साहेब, कर्मचारी ठाकुर, सेहबाज शाह, पोपट शाह, नुरा ठेकेदार आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button