Ahamdanagar

देडगावच्या व्यंकटेश बालाजी मंदिरात अधिक मासानिमित्त धोंडेवारी कार्यक्रम संपन्न !

देडगावच्या व्यंकटेश बालाजी मंदिरात अधिक मासानिमित्त धोंडेवारी कार्यक्रम संपन्न !

सुनिल नजन/अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देडगाव येथील व्यंकटेश बालाजी मंदिरात अधिक मासानिमित्त धोंडेवारी कार्यक्रम संपन्न झाला. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील रामकृष्ण भिंगारे आणि बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्टचे सचिव रामानंद मुंगसे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मुळ आडगाव येथील पण आता आळंदीवाशी झालेल्या ह.भ.प. राधिकाताई खेमनर यांच्या सुमधूर वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी रामायण, महाभारतातील अनेक दाखले देउन अधिक मासाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी बालाजी देवस्थानचे विश्वस्त भानुदास गटकळ,सुनिल मुथ्था,अशोक गांधी, रामभाऊ कुटे,हिरामण फुलारी, सौ.कांताबाई विष्णु मुंगसे,सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच बाजीराव मुंगसे,कडूभाउ तांबे,मा.चेरमन कारभारी चेडे,कारभारी मुंगसे, लक्ष्मण बनसोडे, चंद्रभान कदम,कुंडलिक कदम,भाउसाहेब तांबे, उद्धव नांगरे, जेष्ठपत्रकार बन्सीभाउ एडके,विष्णू मुंगसे,युनुस पठाण, शिवसेनेचे नेते रामदास गोल्हार,हरिभाऊ शेळके, मच्छिंद्र म्हस्के, किसनराव गडाख,संभाजी लांडे, आव्हाने येथील गणपती मंदिर देवस्थानच्या ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी, सखाराम लोंढे,ग्रामसेवक घुले भाउसाहेब, माजी खासदारांचे पी.ए.सोनवणे साहेब आणि गावातील भजनी मंडळ यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button