Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

धनाजी नाना महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

सलीम पिंजारी प्रतिनिधी

फैजपूर तालुका यावलफैजपूर- येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतर महाविद्यालयीन भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धा 2021-22 ह्या यशस्वीरित्या संपन्न झाल्या. भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ सतिश चौधरी हे उपस्थितीत होते. उद्घाटन समारंभ प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. प्रतीभा ढाके, विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य जळगाव विभागाचे सचिव प्रा. डोंगरे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ एरंडोल, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ सचिन झोपे, प्रा. डॉ. बेलोरकर, प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. चाँद सर, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. उमेश पाटील आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.
आंतर महाविद्यालयीन भारतोलन स्पर्धेसाठी पुरुष गटात तिन संघाने व महिला गटात तिन संघाने सहभाग घेतला, शक्तितोलन स्पर्धेत पुरुष गटात आकडा व महिला गटात चार संघाने सहभाग घेतला तसेच शरीर सौष्ठव स्पर्धेत पुरुष गटात सहा संघाने सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता तांत्रिक समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. सुभाष वानखेडे व पंच म्हणून श्री. अविनाश महाजन सर, श्री. योगेश महाजन, श्री. तुषार सपकाळे, प्रा. विशाखा महाजन, श्री. उमेश कोळी, श्री अल्लाउद्दीन तडवी यांनी काम पाहिले.
भारतोलन पुरुष प्रकारात प्रथम- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय- श्री. व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, तृतीय- कला व विज्ञान महाविद्यालय भालोद तर महिला गटात प्रथम क्र.- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय- श्री. व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, व तृतीय क्रमांक. सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय ऐनपूर.
शक्तितोलन पुरुष प्रकारात प्रथम क्रमांक धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय- श्री. व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, व तृतीय क्रमांक शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव आणि महिला प्रकारात प्रथम क्र.- धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, व्दितीय क्र. श्री व्हि. एस महाविद्यालय रावेर व तृतीय क्रमांक. डॉ जी. डी. बेडाळे महिला महाविद्यालय जळगाव.
शरीर सौष्ठव क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय क्र. पी. ओ. नाहटा महाविद्यालय भुसावळ तर तृतीय क्रमांक दा. दे. ना. भोळे महाविद्यालय, भुसावळ यांनी प्राप्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ. सतिश चौधरी सर यांनी आजच्या अधुनीक युगातील खेळाचे महत्त्व व भारतोलन आणि शक्तितोलन सारख्या खेळामुळे शरीर व खेळ या साठी कसे उपयोगी आहेत या विषयावर मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश चौधरी, जळगाव क्रीडा समिती चे सचिव प्रा. चंद्रकात डोंगरे, सहसचिव प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. सुभाष वानखेडे प्रा. उमेश पाटील आणि सर्व उपस्थितांचे आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button