Patur

पातूर येथे वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाव आंदोलन

पातूर येथे वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाव आंदोलन

विजय धोंगडे

संपूर्ण देशभरात कोरोना रोगामुळे लावलेल्या ताळेबंदी दरम्यान अनेक मजूर वर्ग तसेच छोटे मोठे व्यावसायिक यांना प्रचंड अपेषटा सहन कराव्या लागल्या आता सुरू असलेल्या लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी तरही सामान्य जनतेला अजूनही ञास सहन करावा लागत आहे तसेच राज्यातील एसटी सेवा बंद असल्ल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेचा दळण वळन व्यवहार ठप्प झाले आहेत अशा बर्‍याचशा समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व राज्यातील एसटी सेवा सुरू करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यभरात एसटी बसस्थानकावर डफली बजाव आंदोलन करण्यात आले दरम्यान आज पातूर शहर जूने बसस्थानकावर येथे वंचित बहुजन आघाडीचे पातूर तालुक्याच्या वतीने १२ |३ या वेळत डफली बजाव आंदोलन करण्यात आले त्यानंतर तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पातूर तालूका अध्यक्ष निर्भय पोहरे जि परीषद सदयस सुनील फाटकर पं स सदस्य अर्चना डाबेराव पं स सदस्य अर्जुन टप्पे पं स सदस्य श्याम ठाकरे मंगलाताई ईगळे राणा डाबेराव योगेश हिवराळे शरद सुरवाडे गोपाल राठोड आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button