Faijpur

फैजपूर ते रोझोदा रस्ता डांबरीकरण करण्याची आ. शिरीष चौधरी यांचेकडे मागणी

फैजपूर ते रोझोदा रस्ता डांबरीकरण करण्याची आ. शिरीष चौधरी यांचेकडे मागणी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर – फैजपूर येथून रोझोदा रस्त्यावरील सतपंथ पंथाच्या समाधी स्थळापासून ते रोझोदा शिवरस्ता पर्यंत रस्ता च नसल्याने तो किमान 1 कि.मी. चा शेतरस्ता आजपर्यंत कोणी केलेला नाही.
या दोन्ही रस्त्यांमधील अंतरावर किमान 1 कि.मी. खडीकरण व डांबरीकरण करून पुढील रोझोदा शिव रस्ता पासून रोझोदा गावापर्यंत डांबरीकरण करून घ्यावे या मागणीसाठी फैजपूर व रोझोदा शिवारातील शेतकरी व नागरिक काल आ. शिरीष दादा चौधरी यांच्या निवासस्थानी भेटले व त्यांना 70 शेतकरी वर्गाचे सह्या करून निवेदन दिले व रस्ता लवकर करण्यासाठी साकडे घातले. रस्ता झाला तर दोन्ही गावातील अंतर कमी होईल. त्यामुळे लोकांचा फैजपूर येणे जाणे चा मार्ग सुखर होईल, आ. शिरीष दादा यांनी रस्ता लवकर करण्याचे परिसरातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले. याप्रसंगी फैजपूर येथील संदीप चौधरी सर, नगरसेवक केतन किरंगे, योगेश नेमाडे, नितीन पाटील, नथु होले तुषार राणे, कुंदन चौधरी सर, मधुकर चौधरी, रोझोदा येथील शेतकरी स्वप्नील वायकोळे, डिगंबर नेमाडे, पंडित भारंबे, होमकांत सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button