Mumbai

?आताची मोठी बातमी… सुशिलकुमार शिंदेच्या मुलीची संपत्ती जप्त; ईडीने कारवाईचा फास आवळला

?आताची मोठी बातमी… सुशिलकुमार शिंदेच्या मुलीची संपत्ती जप्त; ईडीने कारवाईचा फास आवळला

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दीवान हाऊसिंग फायनांस लिमिटेड घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रिती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांच्या यांची कमर्शिअल संपत्ती जप्त केली आहे.

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दीवान हाऊसिंग फायनांस लिमिटेड घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रिती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांच्या यांची कमर्शिअल संपत्ती जप्त केली आहे.
उल्लेखनीय आहे की, डीएचएफएल कंपनी सध्या दिवाळखोरीचा सामना करत आहे.
या कंपनीचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वधावान यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) डीएचएफएलला दिलेले 3,688.58 कोटी रुपयांचे कर्ज फ्रॉड घोषित करण्यात आले आहे.
याच कंपनीची येस बँकेतील कर्ज आणि घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. कंपनीचे प्रमोटर वधावन बंधू पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची मालमत्ता ईडीने अंमलबजावणी संचालनालयाने संलग्न केली आहे. येस बँक घोटाळाप्रकरणी ईडीने बँकेचे माजी प्रमुख राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रमोटर्स कपिल वधावन आणि धीरज वधावनची 2400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button