Ausa

लामजना परिसरातील बंद डीपी तात्काळ उपलब्ध करुन सुरू करण्यात यावे- प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

लामजना परिसरातील बंद डीपी तात्काळ उपलब्ध करुन सुरू करण्यात यावे- प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

लातुर औसा प्रतिनिधी: – प्रशांत नेटके

-औसा तालुक्यातील शेतकरी हे कायमस्वरूपी दुष्काळाच्या झळा सोसत शेती करतात.लामजना भागात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पेरण्या ह्या चांगल्या पद्धतीने वेळेवर केल्या आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीत लामजना गावामध्ये अधूनमधून वीजपुरवठा खंडित होणे, डीपी बंद होणे, होऊन रब्बी पिकाला वेळेवर पाणीपुरवठा करण्यामुळे पिके वाळू लागली आहेत .
लामजना भागातील
१० सिंगल फेस, ५थ्री फेस डीपी बंद आहेत.

त्यातच वारंवार विजेच्या खंडित होण्याने शेतकऱ्याना पिकांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे. महावितरण ने जळालेल्या व बंद पडलेल्या डीपीची तात्काळ दुरुस्ती करून देऊन वेळेवर विद्युत पुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन सहकार्य करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या लामजना सर्कल च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय लामजना येथे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सर्कल प्रमुख तानाजी कांबळे-लामजने,शाखा अध्यक्ष साबीर कारभारी, रामेगाव सर्कल अंबादास शेळके,उपाध्यक्ष अरबाज कारभारी, सचिव वसीम शेख, संदेश रोंगे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button