Ausa

छायाबाई कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

छायाबाई कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान.

औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथिल छायाबाई बाबुराव कांबळे अंगणवाडी कार्यकर्ती व अशा कार्यकर्ती जनाबाई समदडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा सन.२०२३- २४चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय तपसे चिंचोली यांच्या वतीने दिं ३१ मे २०२३ रोजी प्रथम ग्रामपंचायत तपसे चिंचोली येथे पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली तदनंतर सरपंच सुरवसे विश्म्बर,यांचे हस्ते अंगणवाडी कार्यकर्ती छायाबाई कांबळे याना तर उपसरपंच युवराज यादव, याचे हस्ते आशा कार्यकर्ती जनाबाई समदडे यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी ग्राम विकास अधिकारी जोशी साहेब, अंगणवाडी कार्यकर्ती संपताबाई नेटके,आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान पूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा,यांच्या स्वाक्षरीने हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ,ग्रामपंचायत स्तरिय पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी तपसे चिंचोली येथील सरपंच विश्म्बर सुरवसे , उपसरपंच युवराज यादव ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे, प्रवीण कांबळे, संजय स्वामी,जैनू काळे, दत्तू जाधव, बाबुराव कांबळे ,कालिंदा वडगावे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button