Ausa

तपसेचिंचोली येथे कोरोना लसीकरण मोहीम,200 लाभार्थ्यांना दिली लस

तपसेचिंचोली येथे कोरोना लसीकरण मोहीम,200 लाभार्थ्यांना दिली लस
प्रशांत नेटके औसा
औसा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपसे चिंचोली ग्रामपंचायत व लामजना प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून 45 वर्षावरील वयोगटातील ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावापासून नागरिकांचा बचाव व्हावा ,यासाठी प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तपसे चिंचोली येथील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांचे लसीकरण जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील,लामजना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पेंढारकर , मंगल मुसांडे मॅडम ,ग्रामसेवक विजयकुमार जोशी यांच्या उपस्थितीत लसीकरण
शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद शाळा यांच्या माध्यमातून लसीकरण संदर्भात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले.
याआगोदर लस घेण्यासाठी तपसे चिंचोली ग्रामस्थांना 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून लस घ्यावी लागत होती.गावातील वयोवृद्ध पुरुष महिला यांचे प्रमाण जास्त असून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची हेळसांड थांबावी ,प्रशासनावरील ताण देखील कमी व्हावा या पार्श्वभूमीवर तपसे चिंचोली गावातच लसीकरण सुरू करावी अशी मागणी तपसेचिंचोली येथील ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती.
कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणास गावातील कै .सुशिलाबाई त्रिंबकराव पाटील विद्यालयात प्रारंभ झाला व शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार सकाळी लसीकरण सुरू झाले.यावेळी ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
लसीकरणा साठी आलेल्या ग्रामस्थांना तपसे चिंचोली ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे यांच्याकडून मास्क वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी आपले कुटुंब व गाव सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण संदर्भातील भीती व गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन लामजना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पेंढारकर यांनी ग्रामस्थांना केले.
लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील ,वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पेंढारकर मुसांडे मॅडम,अवचारे मॅडम,प्रेमीला लादे ,हासुरे वीरभद्र , पंडित यादव ,ग्रामसेवक विजयकुमार जोशी ,सरपंच विश्वंभर सुरवसे ,उपसरपंच युवराज यादव ,ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे ,राहुल घुळे,आशा कार्यकर्त्या जनाबाई वाघमारे ,सुवर्णा काळे,अंगणवाडी सेविका मदतनीस संपताबाई नेटके ,छाया कांबळे, कालिंदाबाई वडगावे ,लक्ष्मी कलशेट्टी कोमल नेटके, जयश्री यादव , जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ,गावातील ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button