Kolhapur

दौलतराव निकम विद्यालय व्हनूर शाळेची आंतरराष्ट्रीय शाळेकडे वाटचाल.

दौलतराव निकम विद्यालय व्हनूर शाळेची आंतरराष्ट्रीय शाळेकडे वाटचाल.

सुभाष भोसले-कोल्हापूर

कोणतीही गोष्ट पूर्ण करणेसाठी इच्छाशक्ती ,प्रामाणिक प्रयत्न, तळमळ यागोष्टी असल्यास काहीही अशक्य नाही हे दौलतराव निकम व्हनुरचे मुख्याध्यापक व्ही जी पोवार व त्यांच्या स्टाफ ने दाखवून दिले. गेल्या वर्षभरात या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था चालक,पालक यांनी एकत्र येऊन शाळेचा कायापालट करायचा ध्यास घेतला आणि अथक परिश्रमाने ते यशस्वी करून दाखवले. वाबळेवाडीच्या अभ्यास दौऱ्यानंतर व्ही जी पोवार यांनी चंग बांधला आणि जवळपास 35 लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव करून अनेक भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.काही उल्लेखनीय बाबी पुढीलप्रमाणे 1.9 जानेवारी2017 च्या जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयानुसार शाळेचे 100% वर्ग डिजिटल केले असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत कार्यवाही सुरु आहे 2. सर्व शिक्षक लॅपटॉप चा वापर विद्यार्थी गुणवत्ता व माहिती संकलन साठी करतात.3. CCTV बसविलेले आहेत त्यामुळे मुख्याध्यापकाना आपल्या ऑफिस मधून सर्वांवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. 4.आनंददायी ,लक्षवेधक वर्गरचना 5. शाळेसमोरील बगीचा मुळे प्रसन्न शालेय वातावरण.6. विविध शालेय अभिलेख यांचे डिजीटलायझेसन त्यामुळे शालेय रेकॉर्ड अद्ययावत केले जात आहे.7.शिक्षक ड्रेसकोड 8. अँप च्या माध्यमातून पालकांना विद्यार्थी विषयक माहिती दैनंदिन मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच येत्या काही दिवसात 100 विद्यार्थ्यांची स्वतंत्र अभ्यासिका तसेच सुसज्ज प्रयोगशाळा तयार करण्याचे नियोजन आहे.विशेष म्हणजे मुख्याध्यापक व्ही जी पोवार हे राज्य स्तरावर शिक्षक संघटना प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत पण त्यांनी आपल्यातील शिक्षक जिवंत ठेवला आहे त्याच बरोबर शाळेतील अतिशय नम्रतेने कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांची साथ त्यांना मिळत आहे. या सर्वांचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button