Maharashtra

?जळगांव Live…साइड दिली नाही म्हणून दोघा भावांना मारहाण; तर विनवण्या करणाऱ्या आईलाही मारले

?Crime Diary…साइड दिली नाही म्हणून दोघा भावांना मारहाण; तर विनवण्या करणाऱ्या आईलाही मारले

जळगाव : दुचाकीला साइड दिली नाही म्हणून दमबाजी करून नाशिकला उपचारासाठी जाणाऱ्या कुटुंबीयांची कार थांबवून भामट्यांनी त्यांना जबर मारहाण केली. मुलांना लोखंडी रॉडने मारहाण होत असल्याचे पाहून त्यांच्या आईने मारहाण करणाऱ्या भामट्यांना विनवणी केली. पोलिस पथक तिथे धडकले. दोघांना ताब्यात घेत पोलिस प्रसादानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
योगेश साळुंखे (वय ३७, रा. विठ्ठलपेठ, जुने जळगाव) वडील सुरेश यांना शस्त्रक्रियेसाठी नाशिकला नेत होते.
रविवारी साळुंखे कुटुंबीय कारने (एमएच १९ एचके ३३९५) कालिंका माता चौकमार्गे निघाले. दुपारी दीडला डी-मार्ट चौकात पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने कारसमोर वाहन आडवे लावले. साइड का दिली नाही? असे म्हणत, चालक अरुण साळुंखे यांना शिवीगाळ सुरू केली. योगेश व अरुण दोघांनी विरोध केल्यानंतर त्यांना मारहाण सुरू झाली. एकाने लोखंडी रॉड काढून हल्ला चढवला. कारमधील महिला, त्यांची आई लताबाई मारणाऱ्यांच्या विनवण्या करत होत्या. मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली.
पोलिस धडकले…
हाणामारी सुरू असतानाच उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, सचिन बडगुजर थांबले. काय गोंधळ आहे म्हणून चौकशी केली असता प्रकार समोर आला. मारहाण करणाऱ्या दोघांना जागेवर आणि पोलिस ठाण्यात यथेच्छ प्रसाद दिल्यावर त्यांनी हेमंत चौधरी व जगदीश चौधरी (दोन्ही रा. आदर्शनगर) असे नाव सांगितले. योगेश यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होऊन पोलिस नाईक अल्ताफ पठाण तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button