Bollywood

?️बॉलिवूड Breaking…”ही” अभिनेत्री आहे 34 मुलींची आई..!

?️बॉलिवूड Breaking… ही अभिनेत्री आहे 34 मुलींची आई..!

बॉलिवूड हे असे एक विश्व आहे की जेथे रोज नवीन नवीन गोष्टी घडत असतात.अनेक अभिनेते अभिनेत्री ह्या अनेक कारणांमुळे प्रसिद्धी च्या झोतात असतात.जास्त करून प्रेम प्रकरणे,ब्रेक अप ,सेक्स ,धोका,असे अनेक प्रकार घडत असतात.अश्या अनेक अभिनेत्री/अभिनेते आहेत की जे समाजाभिमुख कार्य देखील करतात.अशीच एक जिनेअभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळ्याच प्रकारची भूरळ घातली होती. वीर-झारा, ‘सलाम-नमस्ते’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात राज्य करणारी ही अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा..सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे.

सध्या प्रिती तिच्या करियरमुळे नाही तर तिच्या स्वभावामुळे चर्चेत आली आहे. प्रितीने एक दोन नाही तर तब्बल 34 मुलींना दत्तक घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 34 मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय प्रितीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतला. 2009 साली त्यांनी ऋषिकेशमधून 34 अनाथ मुलींना दत्तक घेतलं आहे.

एवढंच नाही तर वर्षातून दोनवेळा तरी प्रिती आपल्या 34 मुलींना भेटायला जाते. प्रितीचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे.प्रिती आयपीएल दरम्यान ती कायम तिची क्रिकेट टीम किंग्स इलेवन पंजाबचा उत्साह वाढवताना दिसली होती.

प्रिती सध्या तिचं खासगी जीवन एन्जॉय करत आहे. प्रितीने 2016 साली जीन गुडइनफसोबत लग्न केलं. हे लग्न अतिशय गुपचूप झालं. लग्नाचे फोटो 6 वर्षांनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button