Pandharpur

कोर्टी पत्रकार सन्मान सोहळा व पुरस्कार वितरण संपन्न

कोर्टी पत्रकार सन्मान सोहळा व पुरस्कार वितरण संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने कोर्टी येथील शांती निकेतन गुरुकुल येथे आयोजित केलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी दैनिक पुढारी चे उपसंपादक ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले शांती गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कोंडलकर सर यांना शिक्षण क्षेत्रात आदर्श कामगिरी केल्याबद्दल जिवण गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच प्राध्यापक तांबोळी मॅडम यांना मराठी नाटक या विषयात पीएचडी मिळवल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी मनसे नेते दिलीप बाबू धोत्रे धाराशिव साखर कारखाना चेअरमन अभिजीत पाटील मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रेया ताई भोसले विशू ला मी पत्रकार संघाचे अध्यक्ष अडसूळ सर कार्यक्रमाचे संयोजन संजय मुळे यांनी केले होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button