India

कोरोना Update: पालकांनो सावधान..!लहान मुलांमध्ये ओमियोक्रोन ची “ही” लक्षणे आढळताच दवाखाना गाठा..!

कोरोना Update: पालकांनो सावधान..!लहान मुलांमध्ये ओमियोक्रोन ची “ही” लक्षणे आढळताच दवाखाना गाठा..!

नवीन व्हेरिएंट ओमायक्रोनमुळे लहान मुलांमध्ये अत्यंत विचित्र व असामान्य असे रॅशेज दिसून येत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की विशेष गोष्ट म्हणजे केवळ लहान मुलांमध्येच ही लक्षणे दिसून येत आहेत.त्यामुळे पालक चिंतेत आहेत .

संक्रमित झालेल्या मुलांमध्ये जवळपास 15 टक्के मुलांमध्ये हे रॅशेज दिसून येत आहेत. याशिवाय लहान मुलांमध्ये थकवा, डोकेदुखी, भूक कमी लागणे यांसारख्या समस्या सुध्दा आहेत. ओमायक्रोनची लक्षणे आधीच्या अन्य व्हेरिएंटपेक्षा खूप वेगळी आहेत. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लहान मुलांन सुद्धा हा व्हायरस लक्ष्य करत आहे. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांमध्ये दिसणा-या ओमायक्रॉनच्या लक्षणांबद्दल सविस्तर माहिती.

आतापर्यंत महामारीच्या वेळी केलेल्या सर्वेक्षणामध्ये मोठ्या माणसांमध्ये आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची तीन प्रमुख लक्षणे दिसून आली. ही तीन लक्षणे म्हणजे सतत खोकला येणे, खूप जास्त ताप येणे आणि चव न लागणे.

याशिवाय अन्य लक्षणे सुद्धा आहेत. जी या नव्या व्हेरिएंटने लक्ष्य केल्याचे संकेत देतात. मात्र त्याबाबत अजून ठोस माहिती नसल्याने शास्त्रज्ञांनी अजून त्याबाबत सार्वजनिक खुलासा केलेला नाही. पण डॉक्टरांच्या मते ही तीन प्रमुख लक्षणे दिसल्यास त्वरित उपचारास सुरुवात करावी, ही लक्षणे अंगावर काढू नयेत.
WHO च्या म्हणण्यानुसार अजून तरी कोरोना आणि ओमायक्रोन यांची लक्षणे वेगवेगळी असल्याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही पण ओमायक्रोन हा कोरोनाचाच व्हेरिएंट असल्याचे सिद्ध झाले आहे. तरी WHO ने कोणत्याही सोशल मीडियावरच्या मेसेजेसवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जेव्हा ठोस माहिती येईल तेव्हा सरकारकडून ती कळवली जाईल तोवर नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आणि कोणतीही वेगळी लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घेण्याचे आवाहन WHO ने केले आहे.

ओमायक्रोनला अत्यंत गांभीर्याने घेण्याचे कारण म्हणजे हा व्हेरिएंट लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरत असल्याचे दिसून आले आहे.
लहान मुलांमध्ये ओमायक्रोनची लक्षणे काय दिसतायत याबद्दल अजूनही संभ्रम असला तरी जाणकारांनी काही महत्त्वाची लक्षणे दिसत असल्याचे स्पष्ट केले आहे.

थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखी ही ओमायक्रोनने लक्ष्य केल्यावर दिसणारी सामान्य लक्षणे आहेत. आजवर जेवढी ओमायक्रोनची रुग्णसंख्या आढळली आहे त्यामध्ये ही लक्षणे सर्व रूग्णांमध्ये समान असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला अशी काही लक्षणे दिसली तर अजिबात वेळ न गमावता लगेच त्यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन जा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button