MaharashtraNanded

बिलोली तालुक्याला लागली भ्रष्टाचाराची वाळवी लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

बिलोली तालुक्याला लागली भ्रष्टाचाराची वाळवी
लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

नांदेड प्रतिनिधी : वैभव घाटे

बिलोली तालुक्याला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आसुन बिलोली महसुल प्रशासनातले अधिकारी आणी कर्मचारी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून एसीबीच्या जाळ्यात अटकले आहेत याच धरतीवर बिलोली तालुक्यातील ग्रामसेवक नमुना नंबर ८ ला उतारा लावण्यासाठी मुतन्याळ चा ग्रामसेवक व खतगाव येथील ग्रामपंचायत च्या शिपायास दि.१६ मार्च रोजी पंचायत समितिच्या आवारात १५००० रु.ची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे.

मुतन्याळ येथील तक्रारदार च्या ताब्यात असलेली घरासमोरील मोकळी जागा नमुना नंबर आठ रजिस्टरला नोंद घेऊन नमुना आठ चा उतारा देण्यासाठी संभाजी गोविंद हळदेवाड वय (३०)ग्रामसेवक मुतन्याळ ता.बिलोली अतिरिक्त पदभार,साहेबराव तुकाराम वाघमारे वय(२८) शिपाई ग्रामपंचायत खतगाव अतिरिक्त पदभार मुतन्याळ या दोघांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी केली होती.त्यानुसार या दोघांनाही लाचेचे १५००० हजार रु घेताना रंगेहात अटक करण्यात आले.या कारवाईसाठी पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर,अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे,पोलीस निरिक्षक गणेश पुरी,पो.काॕ.संतोष शेट्टे,एकनाथ गंगतिर्थ,गणेश केजकर,अंकुश गाडेकर,निळकंठ यमुनवाड,अनिल कदम आदि अधिकार्यांचा सहभाग होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button