Pandharpur

युवराज दादा व गणेश पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकरी अन कामगारांनाही दिलासा,,,, माऊली हळणवर

युवराज दादा व गणेश पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकरी अन कामगारांनाही दिलासा,,,, माऊली हळणवर

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : कर्मवीर औदुंबरआण्णाचा
तो काळ आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार अशी आशा आता निर्माण झाली आहे.विठ्ठल परिवार सध्या विभागला असे चित्र दिसत असले, तरीही विठ्ठलच्या निवडणुकीत तो अण्णांच्या काळातील परत ते दिवस येण्यासाठी आता त्यांचे नातू, युवराजदादा पाटील, व यशवंत भाऊ पाटलांचे नातू गणेश पाटील यांचेसह समविचारी लोकांच्या एकहाती सत्ता देण्यासाठी शेतकरी, कामगार नक्की पुढे येणार हे पाहण्यासाठी कोण्या ही जोतिष्या ची गरज नाही. म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आता केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहणार . आहे सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेल्या पाच सहा वर्षापासून डबघाईला आलेला असून चेअरमन व्हाईस चेअरमन हुकूमशाही पद्धतीने सभासद व कामगार यांच्यावर अन्याय करीत असून सत्तेचा गैरवापर करत आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कामगार व सभासदांवर खोटा गुन्हा दाखल करून तीन महिने जेलमध्ये डांबले होते त्यांना जामीन मिळू नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा करीत होते यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांची परवड झालेली होती शेतकऱ्यांच्या या राजवाड्याला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झालेली आहे सध्या बीपी रांगे सर अभिजीत पाटील हेही विठ्ठल च्या सभासदांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहेत त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन पॅनल करून या हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्या व स्वतःची घर भरणाऱ्या संचालकांना धडा शिकवणे गरजेच आहे विठ्ठल वाचवण्यासाठी जे जे कोणी पुढे येतील त्यांच्यासोबत आम्ही नक्की उभे राहू या परिवर्तनाच्या लढाईमध्ये विठ्ठल सहकारी च्या चिमणी मधून सोन्याचा धूर निघण्यासाठी सभासद व कामगारांनी या समविचारी परिवर्तनवादी लोकांना सहकार्य करावे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात विस्थापित असलेल्या सर्व घटकाने एकत्रितपणे लढा देऊया शेतकऱ्याचा राजवाडा शेतकऱ्यांच्या हाती घेऊ या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button