Aurangabad

? Big Breaking..मतिमंद मुला मुलींना एकत्रित विवस्त्र करून अंघोळ प्रकरण….अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांसह 12 जणांवर गुन्हा दाखल

? Big Breaking..मतिमंद मुला मुलींना एकत्रित विवस्त्र करून अंघोळ प्रकरण….12 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद (प्रतिनीधी )प्रवीण तांबे

जटवाडा येथील शरदचंद्र पवार निवासी मतिमंद विद्यालयातील मुला-मुलींना एकत्रित विवस्त्र अंघोळ घातल्याचा प्रकार पाच महिन्यांपूर्वी घडला होता. याप्रकरणी बुधवारी हर्सूल पोलिस ठाण्यात विद्यालयाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याध्यापकांसह बारा जणांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजकल्याण निरीक्षक एस. डी. साळुंके या मार्च महिन्यात शाळेत पाहणीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी शाळेचे प्रवेशद्वार उघडे व सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. तसेच शाळेतील मुला-मुलींना विवस्त्र एकत्र अंघोळ घालण्यात येत हाेती. हे पाहून समाज कल्याण निरीक्षक साळुंके व त्यांच्या पथकाला धक्का बसला होता. त्यांनी याबाबत मुख्याध्यापकाला विचारले असता रोज अशीच अंघोळ घातली जात असल्याचे सांगितले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा मुख्याध्यापक साजिद बादशहा पटेल, वसतिगृह अधीक्षक योगेश राठोड, काळजीवाहक राजेश महादेव निंबाळकर, मदतनीस शेख जाकीर मंजूर, पहारेकरी संतोष पवार, समितीचे अध्यक्ष शौकत पठाण, उपाध्यक्ष राजू पवार, सचिव साजिद पटेल, संस्थाप्रमुख बादशहा पटेल यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, श्रीमती साळुंके यांनी विद्यालयाची पाहणी केली असता विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० वाजेपर्यंत काहीही खाण्यास दिलेले नव्हते. अंघोळीसाठी थंड पाणी दिले हाेते. स्वयंपाकघरात धान्य, भाजीपाला नव्हता. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत गाद्या, पांघरूण नव्हते. मतिमंद मुलांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button