पंढरपूर

वाखरीच्या आश्रमशाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

वाखरीच्या आश्रमशाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

वाखरी, ता.पंढरपूर ( एस एम पोरे)- जवाहरलाल शिक्षण प्रसारक मंडळ ,संचलित माध्यमिक आश्रमशाळा ,वाखरी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन शिबिरा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर दि. 23 डिसेंबर रोजी घेण्यात आले. राष्ट्रीय बासरीवादक, नुतन पोलिस ऊपनिरीक्षक श्री.दादासाहेब खुळे यांनी विद्यार्थ्यांना राज्यसेवा परीक्षेबद्दल सविस्तर माहिती दिली.
आयुष्यात येणाऱ्या असंख्य अङचणींना तोंड देऊन नुकतेच अधिकारी झालेल्या खुळे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरती , वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षासंबंधीची सखोल माहिती दिली. मुळात यश मिळविण्यासाठी गरीबी ही अङचण नसुन जिद्द आणि ध्येय ठेवुन प्रयत्न केल्यास यश मिळतेच असंही ते म्हणाले.
आश्रमशाळा वाखरी येथे दर महिन्याला या प्रकारचे शिबीर घेण्यात येते. शारिरीक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी शाळेतील शिक्षक अथक परिश्रम घेत असतात.
यावेळी प्राचार्या शमशाद बागवान , पर्यवेक्षक पी.जी गायकवाड , महादेव तळेकर यासह इतर शिक्षक व विद्यार्थी ऊपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button