Ratnagiri

नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर

नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर
रत्नागिरी : तौत्के चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे.
वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असून त्यांचा दौरा सकाळीच सुरु झाला आहे.
दरम्यान, झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते कोणती मदत जाहीर करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?
सकाळी 8.35 वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
सकाळी 08.40 वाजता – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
सकाळी 9.40 वाजता – हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता.मालवणकडे प्रयाण
सकाळी 10.10 वाजता – वायरी, ता.मालवण येथे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी 10.25 वाजता – मोटारीने मालवण येथे आगमन व ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी 11.05 वाजता – निवती, ता. वेंगुर्ला येथे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी 11.30 वाजता – चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण
दुपारी 12.35 वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button